शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात शनिवारी मारेगावात चक्काचाम आंदोलन

सर्वपक्षीय सहभाग, मार्डी चौक येथून होणार आंदोलनाला सुरूवात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात किसान एकता मोर्चाच्या वतीने शनिवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्वच पक्ष तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. हे आंदोलनाला सकाळी 11 वाजता मार्डी चौक येथून सुरूवात होणार आहे. सध्या दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे तसेच केंद्र सरकारने आंदोलकांची केलेली मुस्कटदाबी बंद करावी या मागणीसाठी दिनांक 6 फेब्रुवारी देशव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याच अनुशंगाने मारेगावात देखील विविध पक्ष संघटना व सामाजिक संघटनांद्वारे हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी व इतर सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने पारीत केलेल्या 3 कृषी विधेयकाविरोधात सध्या दिल्ली येथे जोरदार आंदोलन सुरू आहे. हे तिन्ही विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी गेल्या दोन ते अडिच महिन्यांपासून दिल्ली येथे सिमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहे. सरकारने शेतक-यांबाबतची चर्चा थांबवली असून आंदोलकांची मुस्कटदाबी करण्यासाठी सिमेवर तारांचे कुंपण आणि खिळे याचे प्रतिरोधक तयार केले आहे. याशिवाय आंदोलकांची रसद तोडून त्या भागातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा:

वणीत शनिवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन

मारेगाव तालुक्यात 29 ग्रामपंचायतीत राहणार ‘महिला राज’

Leave A Reply

Your email address will not be published.