अडेगाव ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
ग्राम पंचायत सदस्यांची गटविकास अधिका-यांकडे तक्रार
सुशील ओझा, झरी: तालुक्याल अडेगाव येथील ग्रामपंच्यायत कार्यालयात विविध कामात भ्रष्टाचार केल्याची तक्रार महिला सदस्यांनी केली असून दोषींवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील अडेगाव येथील महिला ग्रामपंचायत सदस्या वर्षां दत्तात्रय पाल यांनी ग्रामपंच्यायत सचिवाने फॉगीन मशीन घेताना कोणत्याही सदस्यांना विश्वसात न घेता २२ ते २३ हजारात मिळणारी मशीन ८५ खरेदी केल्याचे दाखविले. फॉगीन मशीन खरेदी केल्यापासून एकही दिवस मशीनचा वापर करण्यात आला नसून मशीन खरेदीचा भ्रष्टचार उघड होऊ नये म्हणून दुसऱ्या ग्रामपंचायत मधील मशीन बोलावून रात्री १ ते २ फवारणी करून वापस करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत द्वारे १४ वित्त आयोगाच्या निधीतून फिलिप्स कंपनीचे २० स्ट्रीट लाईट गावात लावण्याकरिता घेतले. त्याची किंमत ४० हजार लावण्यात आले आहे. १४ वित्त आयोगातून गावातील विहिरीवर लोखंडी अँगल लावून जाळी बसविणे व सांडपाणी विहिरीत जाऊ नये याकरिता विहिरीच्या सभोवताल सिमेंट प्लास्टर करून दुरुस्ती करणे आवश्यक असतांना एक वर्षांपासून विहिरीवर फक्त लोखंडी पट्ट्या लावण्यात आला. या प्रकरणात जाळे खरेदीचे खोटे बिल जोडून तसेच कोणत्याही प्रकारची डागडुजी न करता काम पूर्ण झाल्याचे दाखवून अफरातफर करण्यात आल्याचाही आरोप महिला सदस्यांनी केला आहे.
ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत शासनाने जनतेला शौचालय बांधण्याकरिता १२ हजार रुपयाचे अनुदान देण्यात आले. परंतु गावतीलच विठ्ठल शिवाजी कोंगरे य व्यक्ती जवळ शौचालय नसतानाही आर्थिक संगनमत करून 12 हजार मिळवून दिले. असे अनेक असल्याची शंका सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे.
वॉर्ड क्रमांक २ मध्ये नीलकंठ चौधरी ते महादेव पाल यांच्या घरापर्यंत भूमिगत नाली तयार करण्यात आल्या परंतु कामात कोणत्याही प्रकारचे बेड काँक्रीट , एक टोपल सिमेंट न टाकता सरळ पाईप टाकण्यात आले व पाईप जॉईंट कप्लर सुद्धा लावण्यात आले नाही.
ग्रामपंचायत सामान्य फंडातून गावातील सिमेंट रस्ते इस्टिमेट नुसार न करता सिमेंट बेड व सलाखी गायब करून तयार करण्यात आले. ग्रामविकासकरिता व गावातील भूमिगत गटारे बांधण्याकरिता गावातील खाजगी कंपनीने सिमेंट पाईप दिले परंतु सचिवाने १४ वित्त आयोगातून खरेदी केल्याचे दाखवून फंडाची निधी हडप केली आहे.
मागील ७ ते ८ महिन्यापासून एकही सभा कोरम पूर्ण होऊन झालेली नाही कोरम पूर्ण दाखविण्याकरिता गैरहजर सदस्यांच्या खोट्या सह्या सरपंच व सचिव करून आपल्या मर्जीने ठराव लिहून घेत आहे. तरी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संमधीत सचिवाला बडतर्फ करण्याची मागणी ग्रा. प. सदस्या वर्षा पाल यांनी गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांच्या कडे केली आहे.