पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळेची घंटा वेळेवरच वाजली. जवळपास सर्वच विद्यार्थी शिस्तीनं वर्गात चालले. यावेळी मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच कुतूहल आणि औत्सुक्य होतं. आज वर्गात काय मस्ती करायची, कुणाची मजा घ्यायची, काय गमती करायच्या याचं प्रत्येकाच्याच डोक्यात प्लानिंग सुरू होतं. अत्यंत कडक शिस्तीच्या शिक्षकांचाही या क्षणाला धास्तीही उरली नव्हती. कारणही तसं खासच होतं. उकणीच्या नवभारत हायस्कूलचे माजी विद्यार्थी तब्बल 23 वर्षांनंतर आपल्या शाळेत एकत्र आले होते.
बालपणीचा विद्यार्थीदशेचा सुखाचा काळ अनुभवण्यासाठी उकणीच्या नवभारत हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘शाळा भेट व स्नेहमेळावा’ आयोजित केला होता. तब्बल 23 वर्षांनी 2001 सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी पुन्हा शाळेत एकत्र आलेत. जुन्या आठवणींना उजाळा दिला. उकणीच्या जगन्नाथ बाबा मठात गप्पा-टप्पा, किस्से कहाण्यांची मैफल रंगली. अनेकांनी जुन्या दिवसांची आठवण करत आपले अनुभव कथन केले. सामाजिक भावनेतून प्रत्येकाला कशी मदत करता येईल हेही ठरवलं. हे माजी विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.
यावेळी मोहन सूर्यभान धांडे, मनीष घनशाम खाडे, रवींद्र संजय लाड, संजय कृष्णाजी खाडे, विठोबा ढवळे, राजू गणपत खापने, प्रदीप गणपत कातरकर, सोमेश्वर नानाजी ढपकस, दिनेश नानाजी मांडवकर, महेश राघोजी रोडे, सचिन बबन रामटेके, नागेश बडवाईक, संजय जीवतोडे, पुरुषोत्तम रासेकर, संजय वासनकर, गजानन खाडे, कैलास पारशिवे, श्यामसुंदर अर्जुन खापने, डॉ. अनिल शंकर कातरकर, गुणवंत सुभाष येसेकर, नरेंद्र नामदेव गोहोकार, सविता वासुदेव धांडे, अरुणा चंद्रभान मडावी, कविता विट्ठल वाढई, शुभांगी साधुजी देरकर, निशा सुरेश पारखी, प्रियंका विठ्ठल खिरटकर, सुवर्णा साधू उपरे, मनीषा ठावरी, ज्योती सुरेश पारशिवे, पपिता ज्ञानेशर ठेंगणे, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू गणपत खापने, प्रदीप गणपत कातरकर, सोमेश्वर नानाजी ढपकस, दिनेश नानाजी मांडवकर, कैलास पारशिवे, श्यामसुंदर अर्जुन खापने यांनी परिश्रम घेतलेत. प्रियंका विठ्ठल खिरटकर, शुभांगी साधुजी देरकर, रविंद्र संजय लाड, संजय कृष्णाजी खाडे, विठोबा ढवळे, यांनी केले तर आभार कविता विट्ठल वाढई, अरुणा चंद्रभान मडावी, मनीषा ठावरी, दिनेश नानाजी मांडवकर, महेश राघोजी रोडे यांनीदेखील आयोजनाची भूमिका सांभीळली.
या मेळाव्याला अनुपस्थितीमुळे पुरुषोतम पाचभाई, सतीश ढंगले, नरेंद्र गोहोकार, सचिन झीले, महादेव जुनघरी, नंदकिशोर ढवळे, वर्षा कुचनकर सदिच्छा संदेश पाठवलेत. एकत्र आलेल्या या जुन्या वर्गमित्रांनी विविध उपक्रमांची आखणी यावेळी केली. मोहन सूर्यभान धांडे, मनीष घनशाम खाडे, निशा सुरेश पारखी, सविता वासुदेव धांडे आणि शुभांगी साधुजी देरकर यांनी आपला आनंद व्यक्त केला. या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या नात्यांना नवे बळ मिळाले. ‘परत एकदा भेटूया’ या निर्धाराने मेळाव्याची सांगता झाली.
Comments are closed.