कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांना घेऊन जाताना गावकऱ्यांकडून घेराव

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल

0

सुशील ओझा, झरी: कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना रुग्णवाहिका नेत होती. तेव्हा तालुक्यातील वाढोना ( बंदी) बंदीवाढोना फाट्याजवळ काही लोक गाडी अडविण्याकरिता जमा झालेत. जमलेल्या लोकांनी गाडी अडवून समोर आडवे झाले. गावातील एकही माणूस किरोना पॉजिटिव्ह नाही. रिपोर्ट खोटा आहे असे बोलू लागले. गावकऱ्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरून तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

यावरून पोलिसांनी डॉ श्यामराज,कैलास मडावी, बबन पवार, यशोधा चव्हाण, माला चव्हाण, अंकिता चव्हाण, सरदार चव्हाण व इतर लोकांवर कलम १४३, १४७, १८८, २६९, ३४१, ५०४, ५०६ भादंवि व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१ ब, व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ नुसार गुन्हे नोंद करण्यात आले.

वाढोना ( बंदी) येथील ४५ गावकऱ्यांचे तपासणी करण्यात आली. त्यातील ४ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रिपोर्ट १५ सप्टेंबर प्राप्त झाले. यावरून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन गेडाम हे आपल्या कर्मचारी व अॅम्बुलंस घेऊन पोजिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटर मध्ये दाखल करण्याकरिता गेले. चारही रुग्णांना रुग्णवाहिकेत घेऊन गेले,

तक्रारीवरून घटनास्थळी पंचनामा करण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड हे आपल्या कर्मचाऱ्यांसह बंदीवाढोना फाट्यावर पोहचले. तिथे काही लोकांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपी मडावी व इतर चार जणांना पोलीस जीपमध्ये बसवून पोलीस स्टेशनला आणले. मडावी याला आणताच वाढोना येथील १०० ते १५० लोकांनी पोलीस स्टेशनला घेराव केला. पोलिसांनी मडावी याला मारहाण केल्याची चर्चा सुरू होती. पोलिसांनी चारही जणांना सूचनापत्रावर सोडून दिले. पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व राम गडदे करीत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.