अमृत महोत्सवनिमित्त सरस्वती शाळेत विविध उपक्रम

प्रभात फेरी, झेंडावंदन, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, मुकुटबन : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मुकुटबन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवार 10 ऑगस्ट रोजी ‘घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. तर शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेत एकूण 22 विद्यार्थिनींनी भाग घेतला. त्यामध्ये नववीची विद्यार्थिनी मानसी निकाळे यांनी प्रथम दुर्गा लोनगाडगे द्वितीय व कृतिका मंदुलवार हिने तृतीय पुरस्कार पटकविला. मयुरी माधव पवार हिला प्रोत्साहन पर बक्षीस पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Podar School 2025

शनिवार 13 ऑगस्ट रोजी शाळेत आयोजित वकृत्व स्पर्धेमध्ये एकूण 15 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यामध्ये रीतिका मंगलवार ,सानू ऊकीनकार व पुनम बाचले ह्या विजेत्या ठरल्या. या कार्यक्रमाला सरस्वती माध्य. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ममता जोगी व परीक्षक म्हणून जीट्टावार सर इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Comments are closed.