श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वणीत 5 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल

15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, देशभक्ती इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त वणीत 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, देशभक्ती इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयश्री कृष्ण जन्माष्टमी समिती वणी द्वारा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 5 दिवस चालणा-या या कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल विजयकुमार चोरडिया यांनी केले आहे.

सोमवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी ‘वंदे भारत – एक शाम देश के नाम’ या देशभक्तीपर गीत व नृत्याचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम वणीतील मुकुटबन रोडवरील श्री विनायक मंगल कार्यालय येथे संध्या. 6 ते रात्री 10 या वेळेत होणार आहे. झी युवा वाहिनीवरील संगीत सम्राट या सुप्रसिद्ध कार्यक्रमातील कलावंत हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतीकारींच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. याच कार्यक्रमात ‘पिपल्स हिरो अवॉर्ड्स’चे देखील वितरण होणार आहे. वणी व परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, प्रशासकीय, कायदा व सुव्यवस्था, कला, खेळ, संस्कृती, पर्यावरण, आर्थिक, महिला सबलीकरण इत्यादी क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणा-या व्यक्तींचा या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

मंगळवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी अमृत भवन येथे दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहे. यात दुपारी 1 वाजता चिमुकल्यांसाठी कृष्ण दर्शन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा 1 ते 5 या वयोगटासाठी आहे. दुपारी 2 वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. महाभारतातील पात्र या विषयावर ही स्पर्धा आहे. वय वर्ष 5 ते 12 आणि 12 वर्षापुढील अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. दुपारी 3 वाजता पूजा थाली सजावट स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यात पूजेची थाली घरून सजवून आणायची आहे.

दुपारी 4 वाजता 1 मिनिट स्पर्धा, अंदाज बांधणे स्पर्धा, हाऊजी, लकी लेडी, लकी चाईल्ड, बेस्ट ड्रेस चाईल्ड या स्पर्धा घेतल्या जाणार आहे. संध्याकाळी 6 वाजता या दिवसाचे प्रमुख आकर्षण असलेला जागरण कार्यक्रम होणार आहे. नागपूर येथील जय बजरंगी जागरण गृप व कोमल निनावे या हा कार्यक्रम सादर करणार आहे.

बुधवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी अमृत भवन येथे दुपारी 1 वाजता टॅलेन्ट शो आयोजित करण्यात आला आहे. यात धार्मिक विषयावर गाणे, नृत्य, अभियन इत्यादी कलागुण दाखवण्याची स्पर्धकांना संधी मिळणार आहे. दुपारी 2 वाजता मटका सजावट स्पर्धा होणार आहे. यात घरून मटका सजवून आणायचा आहे. दुपारी 3 वाजता झुला सजावट स्पर्धा राहणार आहे. यात झुला घरून तयार करून आणायचा आहे.

दुपारी 4 वाजता आनंद मेळाव्याला सुरूवात होणार आहे. याशिवाय एक मिनिट स्पर्धा, मटका फोडणे स्पर्धा, अंदाज बांधणे स्पर्धा देखील घेतल्या जाणार आहे. संध्याकाळी 6 वाजता या दिवसाचे प्रमुख आकर्षण असलेला सप्त खंजेरी वादक उदयपाल महाराज वणीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उदयपाल महाराज हे सत्यपाल महाराजांचे शिष्य असून ते विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन करतात. त्यांचे राज्यभर कार्यक्रम होतात.

गुरुवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विजय चोरडिया यांच्या निवासस्थानावरून श्रीकृष्ण मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाणार आहे. या मूर्तीची अमृतभवन येथे स्थापना केली जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता श्रीकृष्ण जन्म या विषयावर नाट्य प्रस्तूती होणार आहे. मारेगाव येथील सविता ठेंगणे व संच ही नाटीका सादर करणार आहे. रात्री 12 वाजता मुख्य कार्यक्रम श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अमृत भवन येथे दहीहांडी तसेच काला व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे. पारंपरिक वाद्य, विविध देखावे इत्यादींच्या साथीने ही शोभायात्रा अमृत भवन येथून निघणार आहे. वणीतील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करून या शोभायात्रेची सांगता होणार आहे.

भव्य दिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा – ऍड कुणाल चोरडिया
 वणीत ब-याच कालावधीनंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करून साजरी केली जात आहे. 5 दिवस चालणा-या या जन्मोत्सावात विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, देशभक्तीपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. याशिवाय स्थानिकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे उपस्थितांसाठी दररोज कार्यक्रमानंतर अल्पोपहार आणि महाप्रसादाची व्यवस्था देखील केली आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी अशी सर्वांना विनंती आहे.
– ऍड कुणाल विजयकुमार चोरडिया, अध्यक्ष जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर गोयनका-उपाध्यक्ष, हितेश गोडे -उपाध्यक्ष, सागर जाधव – सचिव, अमोल धानोरकर – सहसचिव, सचिन क्षीरसागर – कोषाध्यक्ष, राजू रिंगोले – सह कोषाध्यक्ष, पियूष चव्हाण – प्रसिद्धी प्रमुख, मयूर गेडाम – सह, प्रसिद्धी प्रमुख, रितेश फेरवाणी – कार्याध्यक्ष, शुभम मदान – सह कार्याध्यक्ष यांच्यासह

आशुतोष पोद्दार, सागर मदान, राजू अडपल्लीवार, कपिल कुंटलवार, मंगेश घोटकर, राज चौधरी, निखिल गोहने, बिट्टू खडसे, निखिल मारखंडे, संकेत रेभे, विनोद खडसे, रोशन जाधव, संदीप जुनघरे, गोविंदा नरपांडे, प्रकाश व-हाटे, विलास आवारी, योगेश आवारी इत्यादी परिश्रम घेत आहे.

वणीत 15 ऑगस्टला ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ हा भव्य दिव्य कार्यक्रम

Comments are closed.