निवृत्तीनंतर चाडे चार वर्षांनंतरही अंगणवाडी सेविका मदतीपासून वंचित

वृद्ध अंगणवाडी सेविका झिजवत आहे कार्यालयाचा उंबरठा

भास्कर राऊत, मारेगाव: अंगणवाडी सेविका म्हणून निवृत्त झाल्याच्या साडेचार वर्षानंतरही निवृत्तीची 1 लाखाची रक्कम न मिळाल्याने आजारी अंगणवाडी सेविका अजूनही कार्यालयाचा उंबरठा झिजवत असल्याचे समोर येत आहे. यावर आम्ही आमचे काम केले एवढेच गुळमुळीत उत्तर कार्यालयातून मिळत आहे.

सविस्तर वृत्त असे की चोपण येथील विमल बबन लालसरे या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. 31 / 7/ 2017 ला सेवेतून निवृत्त झाल्या. सेवकाळातही त्यांना मानधन म्हणून अत्यल्प मोबदला मिळायचा. त्यावर त्या कसाबसा आपला उदरनिर्वाह करीत होत्या. अशातच विहित कालावधीनंतर निवृत्त झाल्यानंतर यांना यांच्या हक्काचं असलेलं मानधन मिळायला हवं. पण तिथेही यांची कुचंबनाच होत असताना दिसून येत आहे.

साडेचार वर्षे लोटल्यानंतरही या सेविकांच्या येणाऱ्या रकमेकडे ना कार्यालयाचे लक्ष न अधिका-यांचे लक्ष आहे. उतारवयात हलाखीचे जीवन जगणाऱ्या या सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेला निवृत्तीनंतरची रक्कम न मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चोपण येथील अंगणवाडी सेविका ही दुर्धर आजाराने त्रस्त असून त्यांना लकवा झालेला आहेत. त्यांना बरोबर चालणे होत नाही. तसेच कार्यालयामध्ये वारंवार चकरा मारूनही त्यांच्याकडे कार्यालय लक्ष देत नसल्याने नेमके कार्यालयाला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे देखील वाचा:

भूमिअभिलेख कार्यालय विरोधात शेतकऱ्याचे उपोषण

आता एका कॉलवर काढा बोअरवेलमध्ये फसलेली मोटर

Comments are closed.