आरोपीला अटक होत नसल्याने संतप्त नागरिकांचा ठाण्यात ठिय्या

अखेर आरोपीला अटक, आज करणार न्यायालयात हजर

विवेक तोटेवार, वणी: गेल्या सात दिवसांपासून एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक होत नसल्याने पीडितेच्या परिचितांनी वणी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. त्यांनी आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली. या आंदोलनानंतर आरोपीला अटक करण्यात आले व आज मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.

प्रेमसंबंधाचे प्रकरण गेले ठाण्यात
तक्रारीनुसार आरोपी मोहम्मद हाकीमोद्दीन पठाण (32) याची पीडितेसोबत काही वर्षांपासून ओळख होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेसोबत संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीला वेकोलिमध्ये नोकरी लागली. पीडितेने व तिच्या कुटुंबियांनी त्याला लग्नासाठी मागणी घातली. सुरवातीला आरोपीने त्याने होकार दिला मात्र त्यानंतर त्याने नकार दिला. त्यानंतर पीडितेने कुटुंबियांनी सोबत घेत वणी पोलीस ठाण्यात 29 जुलै रोजी तक्रार दाखल केली. 

परंतु 7 दिवस लोटूनही आरोपीला अटक करण्यात न आल्याने पीडितेचे नातेवाईक व परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी आरोपीला अटक करा या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. ठाणेदार यावेळी ठाण्यात उपस्थित नव्हते. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांशी त्यांनी चर्चा केली. दरम्यान आरोपी मोहम्मद हाकीमोद्दीन पठाण (32) याला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Comments are closed.