लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गौरक्षण संस्थेला चारा प्रदान

जितेंद्र कोठारी, वणी : लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विदयमाने 31 जुलै रोजी वणी येथील वामनघाट मार्गावरील गौरक्षण संस्थेला गौवंश करीता एक ट्रक चारा (पशुखाद्य) किंमत 2 लाख 50 हजार प्रदान करण्यात आला. या पुर्वीसुध्दा लायन्स क्लब वणी व लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोमातेसाठी 3 गाडी पशुचारा गौरक्षण संस्थेस देण्यात आला होता.

यावेळी वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा वणी विधानसभेचे आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार, लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव लायन किशन चौधरी, लायन चंद्रकात जोबनपुत्रा, गौरक्षण चे सचिव सुधाकर काळे, दिनकरराव पावडे, खरेदी-विक्री समिती वणीचे अध्यक्ष अशोक सुर उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.