अनैसर्गिक कृत्त्यकर्त्यास सश्रम कारावास व दंडाची शिक्षा

मारेगाव न्यायालयाचा निर्णय

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी ए.डी.वामन यांनी आरोपी नामे गणेश जानराव आत्राम रा. धामनी यास अनैसर्गिक संभोगप्रकरणी तीन वर्ष सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा 3 सप्टेंबर 2020 रोजी सुनावली.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीचा मुलगा हा गतीमंद आहे. दि.4/5/2014 रोजी रात्री 9 वाजता फिर्यादी हा बाहेरुन जेवण करून घरी येऊन झोपण्याची तयारीत होता. तेवढ्यात त्याचा मुलगा हा गावातील मंदिराकडून विवस्त्र घरी रडत- रडत काखेत फुलपॅण्ट व अंडरवेअर घेऊन आला. अडकळत भाषेत सांगीतले की, गणेश आत्राम याने मला धरले व ओढत शाळेत नेले कपडे काढून दाबून धरले. नको ते अनैसर्गिक कृत्य केले. फिर्यादी हा मुलाचे रुग्णालयात उपचार करुन दि.7/5/2014 रोजी मुलाला सोबत घेऊन सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशन मारेगावला दिली.

त्यावरून मारेगाव पोलीसांनी आरोपी विरूद्ध भा.दं वि.चे कलम 377 अंतर्गत गुन्हा नोंद केला व सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन ठाणेदार उमेश पाटील यांनी करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी, डॉ. संतोष गुहापेल्लीवार व डॉ.रितेश बाळापुरे व तपास अधिकारी यांच्यासह आठ साक्षिदारांचे पुरावे नोंदविण्यात आलेत.

साक्षिदारांचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस 3 वर्षांचा कारावास व 10 हजार रुपये दंड प्रमाणे शिक्षा सुनावली. यात सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील पी.डी. कपूर व कोर्ट पैरवी मपोका संगीता दोरेवार यांनी काम पाहीले

Leave A Reply

Your email address will not be published.