अनिता भैयाजी तोटेवार यांचे दीर्घ आजाराने निधन
पत्रकार विवेक तोटेवार यांना मातृशोक, आज 11 वा. अंत्यसंस्कार
बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील रामपुरा वार्ड येथील रहिवासी असलेल्या अनिता भैयजी तोटेवार (67) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या गेल्या एक वर्षांपासून आजारी होत्या. गुरुवारी दिनांक 1 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. आज शुक्रवारी स. 11 वाजता त्यांचे राहते घर रामपुरा येथून अंत्ययात्रा निघणार आहे. अनिता या पत्रकार विवेक तोटेवार यांच्या आई आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुलं, मुलगी, सुना नातवंड असा आप्त परिवार आहे. एक वर्षाआधी अनिता तोटेवार यांच्या पतीने निधन झाले होते. तेव्हापासून त्या आजारी होत्या. वणी बहुगणी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments are closed.