मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा मनसेला जय महाराष्ट्र

भाजपात घेतला प्रवेश, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती

बहुगुणी डेस्क, वणी: मनसेचे तडफदार पदाधिकारी व शहराध्यक्ष अंकुश चिंतामण बोढे यांनी आज भाजपात प्रवेश घेतला. त्यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या प्रभाग क्रमांक 11 मधून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. दरम्यान आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेत सर्वांना धक्का दिला आहे.

अंकुश बोढे यांनी हे गेल्या काही काळापासून नगराध्यक्ष पदासाठी तयारी करीत होते. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी जनसंपर्क सुरु केला होता. संपूर्ण वणीतील समस्यांकडे त्यांनी लक्ष देत त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. यातील अनेक समस्या त्यांनी सोडवल्या देखील. मात्र आरक्षण जाहीर झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. त्यानंतर त्यांचे नाव प्रभाग क्रमांक 11 साठी इच्छुक उमेदवारामध्ये होते. याबाबत त्यांनी त्यांच्या सोशल मीडियातून प्रचार देखील सुरु केला होता.

अंकुश बोढे यांनी आज यवतमाळ येथील भाजप कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. माजी आमदार मदन येरावार व जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडा. त्यांना जिल्हा उपाध्यक्ष हे पद देण्यात आले. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रवि बेलूरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपचे शहराध्यक्ष ऍड नीलेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. अंकुश बोढे यांच्या मनसेतील नाराजीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र शिवसेना उबाठा, मनसे एकत्र निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे तर त्यांनी जय महाराष्ट्र नाही केला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Comments are closed.