वणीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण

रुग्णाची संख्या आता 6, परिसर सिल...

0

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 24 जून रोजी वणीमध्ये आणखी एक कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता वणीतील कोरोना रुग्णांचा आकडा 6 झाला आहे. त्यामुळे वणीकरांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. खबरदारी म्हणून सहाव्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्या व्यक्तींना ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच त्या व्यक्तीचे कुटुंबीय व संपर्कात आलेल्या व्यक्तींना कॉरेन्टाईन करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दरम्यान कोविड रुग्ण राहत असलेला परिसरही सिल करण्यात आला आहे.

दरम्यान कालपर्यंत एकून 59 जणांना क्वारेन्टाईन करण्यात आले होते. आज सकाळी एकूण 39 जणांचे रिपोर्ट आले होते. त्यातील 20 जणांचे रिपोर्ट येणे बाकी होते. 20 जणांपैकी संध्याकाळी एका जणाचा रिपोर्ट आला असून हा रिपोर्ट पॉजिटिव्ह आहे. तर उर्वरीत 19 रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. आज जी व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह सापडली, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतक्या लोकांना कॉरेन्टाईन करण्यात येणर आहे. त्यामुळे कॉरेन्टाईन झालेल्यांचा आकडा वाढू शकतो.

निगेटिव्ह व्यक्तींमध्ये दहशत… कधी मिळणार सुटी?
सध्या वणीतून पाठवलेल्या 40 पैकी 37 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या 37 व्यक्तींपैकी काही व्यक्ती होम कॉरेन्टाईन होत्या तर उर्वरित अजूनही कोविड केअर सेन्टरमध्ये आहे. त्यांना सध्या कधी सुटी मिळणार याची आस लागली आहे. विलगीकरण कक्षातच पॉजिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुट्टीबाबत अद्याप जिल्हा पातळीवरून आदेश न आल्याने निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांना अद्यापही कोविड केअर सेन्टरमध्येच राहण्याची नामुष्की आली आहे. इथे योग्य त्या सोयीसुविधाही नसल्याची कॉरेन्टाईन असलेल्यांची तक्रार आहे. 

गुरुनगर ढुमेनगरचा काही भाग सिल
ज्या भागात कोरोनाचा रुग्ण सापडला त्या परिसरापासून 250 मीटरचा परिसर 14 दिवसांसाठी सिल करण्यात आला आहे. हा परिसर आता प्रतिबंधीत (कंटेन्मेन्ट झोन) असून या परिसरातून आता कुणालाही बाहेर निघता येणार नाही. तसेच ज्या अत्यावश्यक वस्तू व सेवा आहे त्या आता प्रशासनाला संपर्क साधून मागवाव्या लागणार आहेत. दरम्यान वणीमध्ये दुपारी अनेक अफवा पसरल्या होत्या.

वणीकरांची चिंता वाढली…
वणीत आणखी आता  6  रुग्ण झाल्याने वणीकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे मास्कचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडू नये, डबलसीट जाऊ नये, सॅनिटायजरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे अशआ सूचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहे. याशिवाय कोरोनाच्या काळात परिसरात अनेक अफवा, शंका याला पेव फुटले आहे. जे कुटुंब आणि व्यक्ती याच्या विळख्यात आले आहे. त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे असून एकमेकांना धीर देऊन, सांभाळून या संकटाशी लढावे. तसेच प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून संपूर्ण खबरदारी घ्यावी असे आवाहन परिसरातील सुजाण नागरिक व ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.