धक्कादायक… कोरोना रुग्ण रात्रभर वणीतच…

आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार समोर

0

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी वणीत आणखी दोन रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली. मात्र या दोन्ही रुग्णांना रात्रभरापासून उपचारासाठी नेलेच नाही, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथानपणा समोर आला आहे. सकाळी वृत्तलिहे पर्यंतही कोविड रुग्ण अद्याप वणीतच आहे. याशिवाय कोविड केअर सेन्टरमध्ये आयसोलेट असलेल्या व्यक्तींची एकाच पल्स मीटर व थर्मल स्कॅनिग मशिनने तपासणी करण्यात येत असल्याने विलगीकरणात असलेल्या व्यक्तींमध्ये दहशत पसरली आहे.

काल संध्याकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी यांनी प्रेस रिलिजद्वारा जिल्ह्यातील कोविड पेशन्टची यादी जाहीर केली. त्यात वणीतील दोन रुग्णांचा समावेश होता. त्यामुळे वणीत एकच खळबळ उडाली होती. नवीन सापडलेल्या रुग्णांना तातडीने आयसोलेट करून त्यांना दाखल करणे गरजेचे होते. सध्या जिल्ह्यातील सर्व रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार केला जातो. मात्र वणीत नवीन सापडलेल्या रुग्णांना रात्रभरातून ना यवतमाळला आणि ना नागपूरला उपचारासाठी नेले. त्यामुळे परिणामी कोविड रुग्ण रात्रभर वणीतच होते. सकाळीही रुग्ण वणीतच आहे.

प्रातिनिधिक फोटो

रुग्णांना लवकरच उपचारासाठी पाठवणार – डॉ. देठे
यवतमाळला पेशंट पाठवण्या पूर्वी संबधित वैद्यकिय अधिका-यांची परवानगी घ्यावी लागते. जिथे हलवण्यात येते त्या शासकिय रुग्णालयात बेड उपलब्ध आहे की नाही याची माहिती घेतल्यावरच रुग्णांना तिथे हलवले जाते. याबाबत वरिष्ठांची परवानगी मिळालेली असून लवकरच दोन्ही रुग्णांना यवतमाळ पाठविण्यात येईल.
– डॉ. देठे, तालुका वैद्यकीय अधिकारी

कोविड केअर सेंटरमधले व्यक्ती दहशतीत
कोविड सेंटर मध्ये दुस-या मजल्यावर कोरोनाबाधित पेशंट असून त्याच मजल्यावर क्वारंटाईन करण्यात आलेल्या इतरही व्यक्ती आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित हे क्वारंटाईन केलेल्या लोकांच्या संपर्कात येण्याचा धोका आहे. आहे. काल वणीत कोरोनाचे दोन रुग्ण सापडले. त्यातील एक व्यक्ती ही होम कॉरेन्टाईन होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्या घरी असलेल्या दोन व्यक्तींना कोविड केअर सेन्टरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र तिथे त्यांचा मुक्त संचार असल्याचा आरोप होत आहे. कोविड सेंटरवर याशिवाय इथे जो स्टॉफ आहे कंत्राटी आहे. वरिष्ठ कामाची मदार कंत्राटीवर ढकलून स्वत: निश्चिंत होत असल्याचा आरोप केला जात आहे.

एकाच पल्स मीटरने तपासणी
आज सकाळी कोविड सेंटरवर सर्वांची नियमित तपासणी झाली असता त्यासाठी एकच पल्स मीटर व एकच स्क्रनिंग मशिन वापरण्यात आली. कोरोनाबाधित रुग्णालाही त्याच मीटर व मशिनने तपासण्यात आले होते. त्यामुळे तिथे उपचासासाठी दाखल असलेल्या व्यक्तींमध्ये दहशत पसरली आहे.

हे पण वाचा… 39 रिपोर्ट प्राप्त… वणीकरांसाठी गूड न्यूज !

39 रिपोर्ट प्राप्त… वणीकरांसाठी गूड न्यूज !

 

Leave A Reply

Your email address will not be published.