अन्वयार्थ: प्रणवदांचं ‘संघ’नमत

ज्येष्ठ पत्रकार अशोक आकुलवार यांचा नवीन लेख

0

यूपीएच्या पहिल्या पर्वात प्रणवदा स्वतः पंतप्रधान होतील असे मानले जात होते. परंतु अंतरात्म्याच्या आवाजाने त्यांना पुढे
देशाच्या सर्वोच्च पदी म्हणजे राष्ट्रपतीपदी विराजमान केले. आता हेच प्रणवदा संघाच्या शिबिरात बौद्धिक देणार याबातमीने
संध्या संपूर्ण राजकरण ढवळून निघाले आहे.

अशोक आकुलवार: नेहरु-गांधी घराण्याशी जवळीक असणारे तरीही आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत आपला वेगळा ठसा
उमटवणारे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय राजकारणात शांत, संयत आणि चटकन प्रतिक्रिया व्यक्त न करणारे
व्यक्तीमत्व. यूपीएच्या काळात काही घटक पक्षांच्या नेत्यांचे रुसवे-फुगवे दूर करण्यात अऩेकदा त्यांनी कळीची भूमिका बजावली
होती. त्यामुळे काँग्रेस हायकमांडला ते नेहमी तारणहार वाटायचे.

31 ऑक्टोर 1984 रोजी जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तेव्हा दिल्ली विमानतळावर राजीव गांधींना रिसिव्ह करायला प्रणवदा स्वतः गेले होते. त्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या तातडीने झालेल्या बैठकीत राजीव गांधी हे स्वतः पंतप्रधान राहतील असे ठरले. हा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली विमानतळावर राजी गांधींच्या कानी स्वतः प्रणवदांनी घातला होता.

यूपीएच्या पहिल्या पर्वात प्रणवदा स्वतः पंतप्रधान होतील असे मानले जात होते. परंतु अंतरात्म्याच्या आवाजाने त्यांना पुढे
देशाच्या सर्वोच्च पदी म्हणजे राष्ट्रपतीपदी विराजमान केले. आता हेच प्रणवदा संघाच्या शिबिरात बौद्धिक देणार या बातमीने
संध्या संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस पक्षाच्या अट्टाहासाने जोपासलेल्या धर्मनिरुपेक्षतेवरच काही मंडळी आता
प्रश्नचिन्ह उमटवीत आहे. तर खुद्द काँग्रेस पक्षही योग्य आणि जबाबदार प्रतिक्रिया देताना दिसत नाही.

एखाद्या विचारपीठावर राजकीय अस्पृष्यता नसावी असे गडकरी म्हणतात. तर काँग्रेस संस्कृतीचे माजी राष्ट्रपती बौद्धिक देणार म्हणून उत्साहाच्या भरात भाजपाच्या एका नेत्याने प्रणवदांना थेट सरदार पटेलांचीच उपमा देऊन टाकली आहे.

खरं म्हणजे संघाच्या व्यासपीठावर संघाच्या विरोधी विचार प्रवाहातील व्यक्तींनी अनेकदा हजेरी लावली. खुद्द महात्मा गांधीही
त्याला अपवाद नव्हते. मग प्रणवदामुळेच इतके वादळ निर्माण का व्हावे? संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेतला
तर प्रणवदांना संघाच्या शिबिरात बौद्धिक देण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. पण ग्यानब्याची खरी मेख इथेच आहे.

प्रणवदांसारख्या राजकारण आणि समाजकारणातील प्रदीर्घ अनुभव असणा-या व्यक्तिमत्वाला आणि अर्थतज्ज्ञाला आपल्या युवा
स्वयंसेवकांनी बौद्धिक देण्यासाठी पाचारण करणे हा संघाचा आणि पर्यायाने भाजपची दीर्घकालीन परिणाम करू शकणा-या एका
व्युहरचनेचा भाग आहे.

गांधी आणि पटेल ही केवळ काँग्रेसचीच संपदा नाही तर ती देशाची संपदा आहे. हा भाजपाचा आणि संघाचा आजपर्यंतचा दावा
एखाद्या वेळेस समजण्यासारखा आहे. परंतु देशाच्या माजी राष्ट्रपतीबाबत राजकीय अस्पृश्यता नको हे समर्थन वरवर योग्य वाटत
असले, तरी या मंडळींच्या दीर्घकालीन व्यवहरचनेचा भाग म्हणून पाहिल्यास हे समर्थन सहजासहजी पचण्यासारखे नाही.

प्रणवदा हे देशाचे माजी राष्ट्रपती तर आहेच पण त्यासोबत इंदिरा गांधीनंतरच्या काळात काँग्रेसच्या राजकीय प्रवासात व
जडणघडणीत प्रणवदा काँग्रेसची ‘बौद्धिक संपदा’ आहे. अशा या बौद्धीक संपदेने आपल्या वैचारिक प्रवाहाशी सुसंगत होईल अशी
काही प्रमाणात का होईना मांडणी करणे भाजपाला व संघाला अपेक्षीत आहे.

असे जर का झाले तर आगामी लोकसभा निवडणुकीतील प्रचारात प्रणवदांची योग्य तेवढीच वाक्य आणि आपल्याला साजेसा
मतितार्थ काढून काँग्रेस विरुद्धच शस्त्र म्हणून वापरण्यात येतील आणि काँग्रेसची कोंडी करता येईल अशी ही व्यहरचना आहे.

यापुढे संघाच्या शिबिरात बौद्धिक देण्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्यात धर्मनिरपेक्षतेचा झेंडा घेऊन वावरणा-या व्यक्तिंना निमंत्रित
करण्यात आले तर आश्चर्य वाटायला नको. खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारकी भाषेत सांगायचे झाल्यास संघाचे
व भाजपाचे हे ‘बौद्धिल सर्जिकल स्ट्राईक’ आहे.

देशाचे माजी सेनादलप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांचेशी भाजपची वाढत असलेली सलगी हा या व्युहरचनेचा एका भाग आहे.
भाजपच्या या सत्ता काळात सरहद्दीपलीकडे भारतीय सैन्याला पहिल्यांदाच संपूर्ण शौर्य गाजवण्याचे स्वातंत्र्य कसे मिळाले असा
भावनात्मक तपशील जर येत्या काळात दलबीरसिंग सुहाग देताना दिसले, तर तो आश्चर्याचा भाग असणार नाही.

परंतू प्रणवदांची एकुनच बाटचाल बघता आपल्या बौद्धिक मार्गदर्शनातून प्रणवदा काँग्रेसची व धर्मनिरपेक्ष तत्त्वाची कोंडी
करण्याची व्युहात्मक संधी भाजप व संघाला मिळू देणार नाही. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात
प्रणवदांनी मोदींच्या काही धोरणांवर आपल्या पदाची प्रतिष्ठा कायम राखून हळूवार पण रोखठोक टिप्पणी केली होती हे विसरून
कसे चालेल.
– अशोक आकुलवार
9765779705

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.