मारेगाव APMC निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत मविआची बाजी
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. काट्याच्या झालेल्या या लढतीत या पॅनलने 18 पैकी 17 जागा जिंकत आपले सहकार क्षेत्रातील क्षेत्रातील वर्चस्व अबाधित ठेवले. भाजप आघाडीला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले. तरी देखील यावेळी भाजपने मविआपुढे तगडे आव्हान उभे केले होते. हमाल मापारी मतदार संघात महाविकास आघाडीचे भास्कर नारायण धांडे 4 मतांनी निवडून आले. तर व्यापारी अडते मतदार संघातून महाविकास आघाडीचे देविदास संभाजी बोबडे आणि महादेव सखाराम साळवे हे दोघेही 12-12 मते एन विजयी झाले.
सर्वसाधारण गटामध्ये वसंत श्रीरंग आसूटकर 160, जीवन विठ्ठल काळे 154, यादव उरकुडे काळे 155, काशिनाथ शामराव खडसे 153, गौरीशंकर ओमप्रकाश खुराणा 153, ब्रम्हदेव मारोती जुनगरी 145, गणू देवाजी थेरे 130 मतं मिळाली. तर सहकारी संस्था महिला गटातून अरुणा अरुण खंडाळकर 185, सुनीता तुळशीराम मस्की 157, सहकारी संस्था अनुसूचित जमाती मतदार संघातून संतोष भिमाजी मडावी 164 तर इतर मागासवर्गीय मतदार संघातून रमण शाम डोये 148, ग्रामपंचायत मतदार संघातून आर्थिक दृष्टया दुर्बल घटक मतदार संघातून अविनाश देविदास लांबट 199 मतदान मिळाले.
नेतृत्वाचा लागला कस
मारेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी कंबर कसलेली होती. वेळेवर गणित जुळवीत त्यांनी देरकर गट, शिंदे गट, मनसे यांच्यासोबत युती करीत मविआसमोर आव्हान उभे केले. त्याविरोधात मविआतर्फे काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे आणि अरुणा खंडाळकर यांच्या नेतृत्वात आघाडी तयार झाली. दोन्ही पॅनल तुल्यबळ वाटत होते. प्रचारदरम्यान मतदारांशी भेटीगाठीदरम्यान दोन्ही गटांना चांगलाच घाम फोडला होता. कोणीही छातीठोकपणे पूर्ण पॅनल आमचे येतेच असे सांगू शकत नव्हते.
ग्रामपंचायतमध्ये झाले क्रॉस वोटिंग
सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत अखेरच्या क्षणी भाजप आघाडी पॅनलने चांगलीच रंगत आणत काँग्रेस आघाडीची दमछाक केली. आघाडीतील एका पक्षाची काही मते फुटल्याने ग्रामपंचायतच्या तिन्ही जागा डळमळीत झाल्या. त्यामुळे ग्रामपंचायत मतदार संघातील तिन्ही जागा भाजप आघाडीला जाईल असे वाटत असताना अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजप आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. तर उर्वरित दोन जागा ह्या केवळ थोडया मताने गेल्या.
ग्रामपंचायत निवडणुकीत मिळाली चूरस बघायला
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत मतदार संघामध्ये महाविकास आघाडी तसेच भाजप आघाडीमध्ये मोठी चूरस पाहायला मिळाली. यात अविनाश लांबट यांनी विजय मिळवीत भाजपचे खाते उघडले. तर उर्वरित दोन जागेसाठी फेर मतमोजणी घेण्यात आली. यात अखेर काँग्रेस आघाडीचे विजय अवताडे व प्रफुल विखणकर हे विजयी झाले.
Comments are closed.