बाजार समिती मारहाण प्रकरण: आईटवार-येल्टीवार वाद पेटला

आईटवार समर्थक शेतक-यांची आयुक्तालयात तक्रार

0

सुशील ओझा, झरी: संपूर्ण देश कोरोनाच्या दहशतीखाली असताना मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआयच्या कापूस खरेदीवरून वेगळेच रणकंदन सुरू आहे. एपीएमसीच्या सचिवांनी रामलू आईटवार यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हे दाखल झाल्यानंतर आता शेतक-यांनी बाजार समितीने मोठा भ्रष्टाचार केल्याची तक्रार आयुक्तालय अमरावती येथे केली आहे. तर सचिव, कर्मचारी व हमाल यांनी राम आईटवर यांना तात्काळ अटक करा असे निवेदन दिले. त्यामुळे सचिव रमेेेश येल्टीवार आणि आईटवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

आईटवार समर्थक शेतक-यांनी केलेल्या तक्रारीत शेतकऱ्यांच्या ऑनलाइन यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात आला असून यात विशिष्ट व्यक्तीलाच प्राधान्य दिले जाते, तूर चना खरेदी करत असताना शेतकर्या कडून प्रति क्विंटल ५० रु घेतल्या जाते, सरकारी धान्य तारण योजने अंतर्गत विशिष्ट अशा एका कुटुंबाचेच व सचिव, सभापतींच्या संबंधीत असलेल्यांचीच नावे यात आहे. असाही आरोप यात आहे.

याशिवाय कापूस व धान्य खरेदी अडत परवाना नूतनीकरणासाठी १० हजाराची मागणी करण्यात आली, तालुक्यातील जिनिंग व प्रेसिंग व आईलमिल कडून येत असलेल्या कर रकमेत घोळ करण्यात आला आहे, शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही अश्या प्रकारचे अनेक घोळ कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये होत आहे, असाही आरोप या तक्रारीत केलेला आहे. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी राम आईटवार यांनी बाजार समिती मधील भ्रष्टचार उघड करण्याचा प्रयन्त केल्यामुळे सचिव यांनी खोटी तक्रार देऊन फसविल्याचा ही आरोप या तक्रारीतून करण्यात आला. यासह आईटवार यांच्यावरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात अशी मागणीही यात केलेली आहे. तक्रारीवर विठ्ठल मुत्यलवार ,दशरथ पडलवार, शांताबाई मुत्यलवार, पोच्छना कवडलवार, रवी म्यानरवार, राजरेड्डी गिज्जेवार, पोशेट्टी आईटवार, विठ्ठल भोयर, आनंदराव मुके, शंकर कुमरे, नागरेड्डी आईटवार सह अनेक शेतकऱ्यांची सही आहे.

कोणताही भ्रष्टाचार  झालेला नाही – बुरेवार

आयुक्तलयात केलेली तक्रार संपूर्ण खोटी असून आम्ही शेतकऱ्याकरिता दिवस रात्र झटत आहोत. कापूस तूर व चना खरेदी सुरळीत चालू आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण व्यवस्था केली असून इथे कोणताही प्रकारचा भ्रष्टाचार समितीतील सभापती, सचिव किंवा संचालक यांनी केलेला नाही. आम्ही सदर तक्रारींचे खंडन करतो.

– संदिप बुरेवार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुकुटबन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.