लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

आई-वडील व आजी-आजोबांचा लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी

0

विवेक तोटेवार, वणी: आई वडील आणि आजी आजोबा यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वणीतील आशुतोष घुगुल यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात आली. आज ते व त्यांचे वडील अशोक घुगुल यांच्यातर्फे 5 हजारांचा धनादेश उपविभागाीय अधिकारी यांना सुपुर्द करण्यात आला.

सध्या कोरोनामुळे देशावर मोठे संकट आले आहे. व्यापार, उद्योगधंदे बुडाले आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना दरम्यान आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता‍ निधी (कोविड-19) या नावाने अकाउंट उघडण्यात आले आहे. वणीतही या निधीसाठी भरभरून मदत केली जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आई-वडील व आजी-आजोबांचा लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी
योगायोग म्हणजे आशुतोष यांच्या आई मंजुषा व वडील अशोक घुगुल व आजी रेखाताई व आजोबा गणपतराव घुगुल यांच्या लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. दर वर्षी ते हा दुग्धशर्करा योग थाटामाटात साजरा करतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी हा सोहळा टाळून त्याचा खर्च कोरोनामुळे आलेल्या आपत्तीनिवारणासाठी दान केला आहे. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.