नवरात्रीनिमित्त ‘एक साडी तिच्यासाठी’ उपक्रमाला सुरूवात

स्माईल फाउंडेशनचा उपक्रम, नवीन तसेच जुन्या साड्या दान करण्याचे आवाहन... गरजू व गरीब महिलांना साडी केली जाणार दान...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नवरात्रीनिमित्त गरजू व गरीब महिलांना देण्यासाठी ‘एक साडी तिच्यासाठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्माईल फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अनेक महिलांकडे साड्यांचा मोठा स्टॉक असतो. मात्र तो वापरणीत नसतो. अशा चांगल्या कंडिशनमधल्या साडी तसेच ज्या महिलांकडे जुन्या साड्या नाही मात्र त्यांना नवीन साडी दान करण्याची इच्छा आहे अशा महिलांकडून नवीन साड्या घेऊन त्या गरजू व गरीब महिलांना दान करण्यात येणार आहे. या नवीन व जुन्या साडी स्माईल फाउंडेशनतर्फे गरजू व गरीब महिलांपर्यंत पोहोचत्या केल्या जाणार आहे. तसेच ज्यांना साडी ऐवजी देणगी देण्याची इच्छा असेल, त्यांच्याकडून देणगी स्वरुपात रोख रक्कम घेऊन त्यातून नवीन साडी खरेदी केली जाणार आहे. या उपक्रमात महिला व पुरुषांनी सहभागी होऊन गरीब व गरजू महिलांना मदत करावी असे आवाहन स्माईल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तसेच नवीन व जुन्या साड्या व देणगी देण्याकरिता सागर जाधव – 7038204209 तन्मय कापसे 7517808753 आदेश दाढे 8484031777 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्माईल फाउंडेशन ही वणीतील एक सुपरिचित संस्था असून या संस्थेद्वारा शहर व परिसरात गेल्या तीन वर्षांपासून विविध सामाजिक, सास्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण पूरक उपक्रम राबवले जाते. स्माईल फाउंडेशनच्या कार्याची दखल घेऊन या संस्थेला विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले आहे. 

Comments are closed.