जंगल परिसराला तार व जाळीचे कम्पाउंड लावा

पं. स. सभापती राजेश्वर गोंड्रावार यांची वनमंत्र्यांकडे मागणी

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी, चाटवन परिसरात चार वाघांचा मुक्त संचार सुरू आहे. चाटवन परिसरात वाघाने अनेक जनावरांवर हल्ला करून जनावरे ठार केली आहे. तर चार दिवसांपूर्वी जुणोनी शिवारात मांडवी येथीलच रहिवासी असणा-या दोन शेतकऱ्यांवर चार वाघांनी हल्ला चढून गंभीर जखमी केले होते. वाघाच्या सततच्या हल्यामुळे शेतकऱ्यांसह मजूर व सर्वसामान्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

मांडवी परिसरातील घटना घडण्यापूर्वी पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी 4 फेब्रुवारीच्या यवतमाळ येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वनमंत्री संजय राठोड यांच्याजवळ मांडवी, चाटवन व कारेगाव येथील वाघाच्या दहशतीबाबत तक्रार केली होती.

शेतकऱ्यांच्या शेतात कापुस, तुर, हरभरा, ज्वारी व भुईमुंग या सारख्या पिके घेतील जाते. मात्र शेतात वाघांचा व रानडुकरांचा मुक्त संचार आहे. शेतात राबणारे शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यासाठी धजावत आहेत. शेतात जाण्यासाठी कायम स्वरूपी जंगल भोवताल तार व जाळी कंपाऊंड वनविभागाच्या मार्फत करण्यात यावे. अशी मागणी राजेश गोंड्रावार यांनी केली.

मांडवी ते कारेगावच्या दरम्यान वनविभागा अंतर्गत येणाऱ्या जवळपास 2 ते 3 किलोमीटर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात यावे. यामुळे तालुक्यातील 6 ते 7 खेड्यांना पाटणबोरी मार्केट येण्याजाण्यासाठी सोईचे होईल. वन विभागाने ह्या रस्त्यासाठी लागणारे कादगपत्रे व परमिशन देऊन रस्ता पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी वनंमंत्र्यांकडे केली आहे.

हे देखील वाचा:

पीआरसीचा दौरा रद्द झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांत आनंदी वातावरण

चेक बाउंस प्रकरणी 3 महिन्यांचा कारावास व 70 हजार दंड

Leave A Reply

Your email address will not be published.