पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपचे निषेध आंदोलन

प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यवाहीची मागणी

0

जब्बार चीनी, वणी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी वणीत भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. पूजा चव्हाण प्रकरणात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत त्याची चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा आंदोलकांनी दिला.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बारा ऑडिओ क्लिप महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना दिल्या आहेत. परंतु अजून पर्यंत पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. या प्रकरणी भाजपतर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी एका राजकारण्याचे नाव देखील येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा सरचिटणीस रवी बेलुरकर, विजय पिदूरकर, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, किशोर बावणे, गजानन विधाते, मंगला पावडे, संध्या अवताडे, लिशा विधाते, राकेश बुग्गेवार, कैलाश पिपराडे, शंकर बांदूरकर, आरती वांढरे, जयमाला दरवे, मंजुषा झाडे, अशोक सूर, नितीन वासेकर, अरुणा जाधव, भरती तलसे, अलका जाधव, मंजुषा लोथे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

सेक्स रॅकेट व्यवसायाला ‘ब्लॅकमेलिंग”चा जोडधंदा (भाग 4)

पीआरसीचा दौरा रद्द झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांत आनंदी वातावरण

Leave A Reply

Your email address will not be published.