गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करा
● वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद मैदानात
सुशील ओझा, झरी: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशांत लॉकडाऊन केल्याने शाळा महाविद्यालये बंद पडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय दिला आहे. मात्र खेड्यापाड्यात ऑनलाईन शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारने ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करून द्यावी अशा मागणीचे निवेदन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने तहसिलदार यांचा मार्फत शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.
सध्या अऩेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेतले जात आहे. मात्र यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनाच याचा लाभ मिळत आहे. या गोबगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षणासाठी साधने पुरवावी तसेच त्यांच्या ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद झरी तालुकाध्यक्ष कुणाल पानेरी, तालुका उपाध्यक्ष श्रावण टिकले, तालुका सचिव वैभव मोहीतकर, कार्याध्यक्ष योगेश जेऊरकर, सोशल मीडिया प्रमुख वैभव कुडमेथे, शहराध्यक्ष प्रशांत राऊत, संतोष केराम आदी उपस्थित होते.