पक्षांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’
स्माईल फाउंडेशनचा अभिनव उपक्रम
जितेंद्र कोठारी, वणी: शहरीकरणामुळे शहरात पक्षांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत आहे. यावर उपाय म्हणून पक्षांच्या संवर्धनासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात परिसरातील अनेक झाडांवर कृत्रिम घरटी तयार करण्यात आली आहे.
सदर घरटे हे कूलरचे जुने टब, बॉटल, लोखंडी स्टँड इ. चा वापर करून तयार केले आहे. यासह पिप्यांचा वापर करूनही घरटी तयार करण्यात आली आहे. पक्षांसाठी खाद्य व पिण्याची पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. शहरातील वॉटर सप्लाय च्या आतमध्ये स्माईल फाउंडेशन तर्फे पक्षांसाठी हे ‘पक्षीतीर्थ’ उभारण्यात आले आहे. याठिकाणी पक्षांसाठी दाण्यापाण्याची व्यवस्था देखील केली गेली आहे.
येत्या काही दिवसात इतर ठिकाणीही पक्षांसाठी अशाच कृत्रिम घरट्यांची सोय केली जाणार असल्याची माहिती स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी दिली. या उपक्रमासाठी पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, तन्मय कापसे, गौरव कोरडे, महेश घोगरे, अनिकेत वासरीकर , दिनेश झट्टे, सचिन काळे, सिद्धार्थ साठे, कृनिक मानकर यांच्यासह स्माइल फाउंडेशनच्या स्वयंसेवाकांनी परिश्रम घेतले आहे.
हे देखील वाचा:
पाहिजेत: मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, आर्किटेक्ट, सेक्युरिटी गार्ड, प्यून
Comments are closed.