संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त अशोक राणा यांचे व्याख्यान

शेतकरी मंगल कार्यालय येथे 2 फेब्रुवारीला संध्याकाळी होणार व्याख्यान

विवेक तोटेवार, वणी: संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज जयंती निमित्त संत साहित्याचे गाढे अभ्यासक धर्म, संस्कृती व इतिहास भाषा संशोधक प्रा. डॉ. अशोक राणा यांचे प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान गुरुवारी 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शेतकरी मंगल कार्यालय येथे होणार आहे. सकल कुणबी समाज व ओबीसी (व्हीजे, एनटी, एसबीसी) जातीनिहाय जनगणना कृती समिती वणी, मारेगाव, झरी यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण देरकर अध्यक्ष एकविरा महिला नागरी पतसंस्था मारेगाव, तर उदघाटक प्रतिभा धानोरकर आमदार वरोरा, भद्रावती, स्वागताध्यक्ष संजय खाडे अध्यक्ष श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणी, तर प्रमुख अतिथी म्हणून आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी, प्रदीप बोनगीरवार अध्यक्ष ओबीसी ( व्हीजे, एनटी, एसबीसी) जातीनिहाय जनगणना कृती समिती वणी, मारेगाव, झरी, विजय पिदूरकर समन्वयक राष्ट्रीय ओबीसी महासंघ, प्रमोद इंगोले अध्यक्ष नृसिंह व्यायाम शाळा वणी उपस्थित राहणार आहेत. तरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments are closed.