स्पेनमधील रांगोळी महोत्सवासाठी वणीच्या अश्विनी वऱ्हाडे हिची निवड

वणीच्या सुपुत्रीची आंतरराष्ट्रीय भरारी, जेकोबिन या उत्सवामध्ये काढली रांगोळी

0

जब्बार चीनी, वणी: युरोप खंडातील स्पेनमधील सांतियागो या शहरामध्ये दर 5, 6 आणि 11 वर्षाच्या अंतराने जेकेबिन वर्ष म्हणून एक पवित्र सोहळा साजरा केला जातो. त्यामध्ये वणीच्या अश्विनी दीपक वऱ्हाडे हिने आकर्षक रांगोळी रेखाटून या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या उत्सवात आयोजकांतर्फे एक थिम देण्यात आली होती. जगातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या मटेरियलचा वापर करून अश्विनीने रांगोळी साकारली होती.

अल्फ कामिनो दि सांतियागो या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत महोत्सवासाठी जवळपास 30 देशांमधून 280 शहरांमधून रांगोळी कलाकार या निवडले गेले होते. भारतामधून सांगलीचे आंतरराष्ट्रीय रंगावलीकार किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस कलाकारांची निवड करण्यात आली होती. यात अश्विनीचा देखील सहभाग होता.

रांगोळी क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतल्याने वणीसह परिसरांमधून अश्विनी हिचे कौतुक होत आहे. अश्विनी या नेहमीच सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये रांगोळीतून प्रबोधन करण्याचे काम करते. सध्या अश्विनी चित्रकला विषयातील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. अश्विनीच्या जागतिक पातळीवरील भरारीमुळे तिचे परिसरात कौतुक होत आहे.

स्पेनमधील सांतियागो या शहरामध्ये दर 5, 6 आणि 11 वर्षाच्या अंतराने जेकेबिन वर्ष हा एक पवित्र सोहळा साजरा केला जातो. या पवित्र वर्षामध्ये स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात व आपल्या सर्व चुका परमेश्वर माफ करून देतो अशी श्रद्धा आहे. म्हणून या वर्षाला पवित्र वर्ष म्हणजेच जाकोबिओ वर्ष असे संबोधले जाते.

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.