आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

0
367

विवेक पिदूरकर: आपला परिसर हा जंगलाच्या लगत असल्याने शेतकऱ्यांना रानडुकरे, नीलगाय, हरीण, सांबर यांचा कायमच अतिशय त्रास सहन करावा लागतो. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे जवळपास 75 टक्के पिकांचे नुकसान होते. वन्यप्राण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी वणीतील वरोरा रोडवरील R & N सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्समध्ये Z+ सुरक्षा कंपनीची कुंपणासाठी सोलर झटका बॅटरी मशिन उपलब्ध आहे. सध्या काही काळासाठी ही झटका मशिन अवघ्या दीड हजारापासून उपलब्ध करून दिली जात आहे. या व्यतिरिक्त इतर मशिन देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे शेतक-यांसाठी एक्सचेंज ऑफरची सेवा देखील दिली जात आहे. या झटका मशिनच्या करंटमुळे पाळीव व वन्यप्राण्यांसह मनुष्याचीही जीवितहानी होत नाही. R & N सिस्टिममध्ये 2 एकरापासून 150 एकरापर्यंतचे मॉडल उपलब्ध आहेत.

घाम गाळून पिकवलेले पीक केवळ वन्यप्राण्यांमुळे उद्ध्वस्त होते. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागते. यापासून बचाव करण्याासाठी अनेक शेतकरी विष प्रयोग, दारुगोळ्याचा प्रयोग किंवा कुंपणाला इलेक्ट्रिक करंट देखील लावला जातो. मात्र यामुळे अनेकदा जंगली जनावरासह पाळीव प्राण्यांचा तसेच प्रसंगी याचा करंट लागून मनुष्याचा देखील मृत्यू होतो. R & N सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्स या प्रतिष्ठानमध्ये सोलरवर चालणारी झटका मशिन उपलब्ध आहे. ही मशिन लावल्यास पिकांचे तर रक्षण होतेच शिवाय कुठलीही जीवित हानी होणार नाही.

शेताच्या कुंपणाला लावलेल्या या सिस्टिमद्वारा डी.सी. हाय होल्टेजचा झटका प्रतिसेकंदाला दिला बसतो. या धक्यामुळे वन्यप्राण्यांमध्ये भीती निर्माण होते व ते दुसऱ्यांदा असे कुंपण लावलेल्या शेताकडे फिरकत नाही. अनावधाने मनुष्याचा जरी या तारेच्या कुंपणाला स्पर्श झाला तरी त्याला केवळ हलका झटका बसतो व जिवीतहानी होत नाही.

Z+ सुरक्षा झटका मशिनचे वैशिष्ट्ये
सदर कंपनी ही ISO मानांकन प्राप्त कंपनी आहे. या झटका मशिनचा कोणताही मेन्टन्स करावा लागत नाही. ही मशिन एका सेकंदाला सुरू होते तर दुस-या सेकंदाला बंद होते त्यामुळे कोणतीही जीवितहानी होत नाही. विशेष टेक्नॉलॉजीद्वारा इलेक्ट्रीक दाबावर नियंत्रण ठेवले जाते. मशिनची बॅटरी चार्जिंग करण्याची गरज नाही सौर उर्जेवरच ही बॅटरी चार्ज होते. उन्ह नसताना किंवा पावसाळ्यातही ही मशिन योग्य पद्धतीने काम करते. काही समस्या आल्या अवघ्या दोन दिवसात मशिन दुरुस्त करून दिली जाते.

सदर मशिन ही रात्री बंद होते तर सकाळी सुरू होते. एक आठवडा जरी सूर्यप्रकाश नसला तरी मशिन काम करीत राहते व पिकांचे संरक्षण होते. तार तुटल्यास किंवा पिकांच्या फांदीचा स्पर्श झाल्यास अलार्म सुरू होतो. बॅटरी डिसचार्ज होत नाही. कोरड्या जमिनीवरही ही सिस्टिम काम करते. याशिवाय अर्थिंगसाठी तार शेतात फिरविण्याची गरज नाही. विशेष म्हणजे पावसाळ्यात ताराला हिरवळ लागल्यास बॅटरी डिसचार्ज होण्याची समस्या असते मात्र या मशिनमध्ये ही समस्या येत नाही.

डेमोसाठी संपर्क साधू शकता: संचालक
सदर मशिनचा आम्ही डेमो उपलब्ध करून दिला आहे. केवळ एका कॉलवर तुम्हाला या मशिनचा डेमो दिला जाईल. आम्ही अधिकृत डिलर असल्याने ग्राहकांना अत्यल्प दरात मशिन मिळते. याशिवाय ठोक तसेच चिल्लर विक्रीही केली जाते. ज्या शेतक-यांना मशिनन एक्सचेंज करायची आहे त्यांना एक्सचेंज देखील करता येणार आहे. अधिक माहितीसाठी एकदा आमच्या वरोरा रोडवरील नगर परिषदेच्या कॉम्प्लेमधील प्रतिष्ठानाला भेट द्यावी
– संचालक, आर ऍन्ड एन सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्स

पत्ता: नगर परिषद कॉम्प्लेक्स, ब्लॉक नं. 34, वरोरा रोड, ओरिजिन कॉम्प्युटरच्या बाजुला, वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 8999124806, 9767816735

Previous articleसहकारी बँक कॉलनीमध्ये रस्ता बांधकामात दिरंगाई
Next articleवणी जवळ आढळली पृथ्वीवरील पहिल्या सजीवांची जीवाश्मे
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...