जितेंद्र कोठारी, वणी: शुल्लक भांडणातून एकाच कुटुंबातील दोन महिलांसह तिघांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील मंदर येथे घडली. या प्रकऱणी वणी पो.स्टे. मध्ये ऍट्रोसीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश मारोती मोवाडे, अनिता जगदीश मोवाडे आणि विमल मारोती मोवाडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे आहे.
फिर्यादी छाया भास्कर जीलठे या मंदर येथील रहिवाशी आहे. त्यांच्या घराशेजारीच मोवाडे कुटुंब राहतात. छाया यांच्या मुलीने सतीश मारोती मोवाडे सोबत प्रेमविवाह केला. त्यामुळे फिर्यादी व मोवाडे कुटुंबात बोलचाल बंद होती. सध्या छाया जीलठे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. त्यासाठी त्यांनी बांधकामाचे साहित्य घरी आणले आहे.
बांधकामासाठी आणलेली रेती रस्त्यावर का टाकली? या कारणावरून त्यांचे शेजारी असलेल्या मोवाडे कुटुंबातील सदस्यांनी जीलठे पती-पत्नी सोबत वाद घातला. तसेच सार्वजनिकरित्या अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून जीलठे दाम्पत्याने वणी पोलीस स्टेशन गाठून मोवाडे कुटुंबातील तिघाविरुद्द फिर्याद नोंदवली.
फिर्यादवरुन वणी पोलिसांनी जगदीश मारोती मोवाडे, अनिता जगदीश मोवाडे आणि विमल मारोती मोवाडे रा. मंदर ता. वणी विरुद्द 294, 506, 34 सहकलम 3(1)(R), 3(1)(S) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार करीत आहे.
हे देखील वाचा:
[…] […]