हॉटेल चालकावर कु-हाडीने हल्ला, चिखलगाव येथील घटना

बोधे नगर गेटवरील घटना, शुल्लक वादातून हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: शुल्लक वादातून एका तरुणाने हॉटेल (कॅन्टीन) चालकाला कु-हाडीने मारहाण केली. 14 जानेवारी रोजी ही चिखलगाव येथील बोधे नगर गेटवर ही घटना घडली. या मारहाणीत कॅन्टीन चालक जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मारोती कवडू पोतराजे (40) हे चिखलगाव येथील रहिवासी आहे. त्यांचे लालपुलिया परिसरात चहा नाष्ट्याचे छोटेसे हॉटेल आहे. आरोपी अमोल ठाकरे (27) हा रामनगर चिखलगाव येथील रहिवासी आहे. तो नेहमी पोतराजे यांच्या कॅन्टीनवर चहा-नाष्ट्यासाठी यायचा. त्यामुळे त्यांची ओळ आहे. दिनांक 14 जानेवारी रोजी रात्री 7.45 वाजताच्या सुमारास अमोल हा पोतराजेंच्या कॅन्टीनवर दारू पिऊन आला. यावेळी पोतराजे यांनी त्याला त्यांच्या हॉटेलमधले टेबल परत मागितले. त्यावर त्याने टेबल परत करणार नाही असे सांगत वाद घातला व तिथून निघून गेला.

15 ते 20 मिनिटांनी पोतराजे हे हॉटेल बंद करून बोधे नगर रोडने घरी जात होते. त्याचवेळी अमोल हा बोधे नगरच्या गेटजवळ कु-हाड घेऊन उभा होता. त्याने कु-हाडीने पोतराजे यांच्या दोन्ही पायावर, पाठीवर व डाव्या हातावर वार केले. यात त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला जखम होऊन रक्त आले. मारहाणीमुळे ते रस्त्याच्या बाजूला पडले. दुस-या दिवशी त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अमोल ठाकरे विरुद्ध भादंविच्या कलम 324. 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा; 

 

Comments are closed.