भांडण सोडवणे पडले महागात, काठी व दगडाने मारहाण

चुलत भावाचा लहान भावावर काठी आणि दगडाने हल्ला

बहुगणी डेस्क, वणी: चुलत भाऊ त्याच्या पत्नी व मुलाला मारहाण करत होता. त्यामुळे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडणे लहान भावाला चांगलेच महागात पडले. या रागातून चुलत भावानेच काठीने लहान भावावर काठीने हल्ला केला. पेटूर येथे ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

साईनाथ गावंडे (35) हा पेटूर येथील रहिवासी असून तो शेती करतो. त्यांचा चुलत भाऊ मंगेश गावंडे (40) हा देखील पेटूर येथील रहिवासी आहे. तो साईनाथच्या घराजवळच राहतो. वडिलोपार्जित शेतीच्या हिश्यावरून या दोन भावात वाद सुरु आहे. दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास साईनाथ घरी असताना मंगेश हा घरासमोर दारू पिऊन आला. तो त्याच्या पत्नीला व मुलाला शिविगाळ करत होता.

भावाचा वाद बघून साईनाथ हा मध्ये वाद सोडवण्यास गेला. तर त्याने साईनाथला शिविगाळ केली. तसेच लाकडी काठीने मंगेशला मारहाण केली. यात साईनाथच्या मनगटाला व कानाला मार लागला. काही वेळाने मंगेश पुन्हा आला व त्याने साईनाथच्या कुटुंबीयांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने दगड उचलून साईनाथच्या आईला मारला. त्यामुळे तिच्या हाताला जखम झाली.

झालेल्या घटनेनंतर साईनाथने वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतला व त्याने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी मंगेश विरोधात भादंविच्या कलम 324 व 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा; 

Comments are closed.