बे म्हटल्यामुळे तरुणावर प्राणघातक हल्ला

आरोपींना रात्रीच सोडल्याने विविध चर्चेला उधाण

0

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी रात्री घरी परत जाणा-या एका तरुणावर शुल्लक कारणावरून काही इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची तक्रार वणी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतके व गुन्हे दाखल केले. परंतु त्यांना रात्रीच सोडून देण्यात आल्याचे समजताच परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय.

सूरज तुराणकर मंगळवारी रात्री 9 वाजता घरी जात होते. प्रगती नगर जवळील मेहता यांच्या घराजवळील रस्त्यावर सोयाबीन धान्य खरेदी केंद्र आहे. या ठिकाणी दिवसभर वाहनांची वर्दळ असते. घरी जात असतानाच सुरजला यांना फोन आला. त्यामुळे ते आपले दुचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून मोबाईलवर बोलत होते.

त्याचवेळी तिथून वाहन (MH29 BC 2346) आले. वाहन चालक जोरजोरात हॉर्न वाजवत होते व तिथून बाजूला जाण्यास सांगितले. त्यावर सूरज यांनी ‘बाजूला होतो ना बे’ असे म्हटले. यावर ‘बे’ का म्हटलं म्हणून गाडीतून पाच सहा इसम खाली उतरले आणि सूरज उर्फ तोमदेव तुराणकर यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात सुरज यांना गंभीर इजा झाली असून ओठाला तीन टाके पडले आहे. या गाडी मध्ये असलेले इसम हे अवैध कोळसा चोरी, दारू विक्री इत्यादी अवैध व्यवसायाशी संबंधित असून गुंड प्रव्रुतीचे असल्याची माहिती सूरज यांनी वणी बहुगुणीला माहिती दिली.

सदर घटने बाबत वणी पोलिस स्टेशन ला गुन्हा नोंद केली आहे. आरोपींवर कलम 324, 504, 34 गुन्हे नोंद करून अटक केली. मात्र असे सर्व आरोपीला रात्रीच सोडून देण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर न करता सोडून का देण्यात आले? हा आता चर्चेचा विषय बनला आहे. सध्या विविध वादग्रस्त प्रकरणामुळे वणी पोलीस ठाणे चर्चेत आले. त्यातच आता आरोपींना रात्रीच सोडल्याने पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.