मारेगाव येथे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव
मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे ठाणेदारांचे आवाहन
भास्कर राऊत. मारेगाव: वेगवेगळ्या अपघातात डिटेन केलेल्या 56 वाहनांचा लीलाव दि.6 ऑगस्टला पोलीस स्टेशन मारेगाव येथे होणार असून या लिलावामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहन मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.जगदीश मंडलवार यांनी केलेले आहे.
मारेगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या अपघातात 56 वाहने डिटेन केलेली होती. या वाहनांबाबत वाहनमालकांनी आतापर्यंत मालकी हक्क सिद्ध केलेला नाही. पोलीस स्टेशनला असलेल्या माहितीच्या यादीतील वाहने ज्यांची असतील त्यांनी आपल्या वाहनाचे मालकी हक्काचे मूळ कागदपत्रे दि. 3/ 8/ 2021 पर्यंत दाखवून स्वतःच्या ताब्यात घेऊन जावे. त्यानंतर त्या वाहनांवर कोणीही आपला मालकी हक्क दाखवल्यास तो ग्राह्य धरल्या जाणार नाही याची नोंदही घ्यावी असे पोलीस निरीक्षक यांच्यातर्फे सांगण्यात आले.
यानंतर दि. 6 ऑगस्टला सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये या वाहनांचा लीलाव करण्यात येणार असून या लिलावामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी केले आहे.
हे देखील वाचा: