मुकुटबन येथील RCCPL च्या खाणीला 5 स्टार रेटींग प्रदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: RCCPL प्रा.लि.ची मुकुटबन लाइमस्टोन आणि डोलोमाईट माइन्स (M.P.Birla Group) ला खाण मंत्रालयाच्या इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, नागपूर कडून 5 स्टार रेटिंग प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय खनिज विकास निगमच्या भारतीय खान ब्यूरो (आईबीएम) च्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात RCCPL ला हा सन्मान मिळाला आहे. खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज तसेच केंद्रीय कोळसा खाण आणि संसदीय कामकाज मंत्रालयाचे प्रल्हाद जोशी यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थित होती.

राष्ट्रीय खनिज विकास निगमच्या नियंत्रणात असलेल्या ज्या खाणी सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करतात त्याला खाण मंत्रालयाद्वारे 5 स्टार रेटिंग दिले जाते. यात योग्य व्यवस्थापन, परिवर्तन व पुनर्वास, पर्यावरण, सामाजिक कार्यक्रम, स्थानिक सामुदायीक उपक्रम तसेच आंतराष्ट्रीय मानकांनुसार कार्य इ. बाबी रेटिंग देताना गृहित धरल्या जातात. सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मुकुटबन लाइमस्टोन आणि डोलोमाईट माइनला 5 स्टार रेटिंग देऊन सन्मानीत करण्यात आले.

RCCPL PVT. LTD चे मुख्य उत्पादन अधिकारी (CMO) रजत कुमार प्रूस्टी, युनिट हेड अभिजीत दत्ता आणि HOD कृष्णकुमार राठोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यवतमाळ जिल्ह्यातील ही नवीन कॅप्टिव्ह इंटिग्रेटेड खाण असून स्थानिक लोकांमध्ये पर्यावरण विकास कार्याचे लक्ष्य साधून खाणीचे कार्य सुरू आहे. याचा मला अभिमान वाटतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

Comments are closed.