हजारो वणीकरांनी घेतला आयुष्यमान भारत कार्ड उपक्रमाचा लाभ

आज रंगारीपुरा, जैताईनगर व भीमनगर येथे संध्याकाळी उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत “सेवा पंधरवडा” (दि. 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025) राबवण्यात येत आहे. या निमित्ताने शहर भाजपतर्फे आयुष्यमान भारत कार्ड अभियान  सुरु आहे. या अभियानांतर्गत आता पर्यंत 1023 वणीकरांनी ‘आयुष्यमान भारत कार्ड’ तयार केले आहे. आता हे कार्डधारक प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार करण्यासाठी पात्र झाले आहेत. तर 92 जणांनी आतापर्यंत आभा कार्ड तयार केले आहे. वार्डातील दुर्गा उत्सव मंडळजवळ हा उपक्रम राबवला जात आहे. आज रंगारीपुरा, जैताईनगर व भीमनगर येथे संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत हा उपक्रम निशुल्क राबवला जात आहे. या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे शहर अध्यक्ष ऍड. नीलेश चौधरी यांनी केले आहे. 

आतापर्यंत शहरातील विविध प्रभागात हे अभियान यशस्वीरित्या राबवले गेले. आज सोमवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी माँ दुर्गा माता एकता मित्र मंडळ भीमनगर, स्त्री शक्ती दुर्गा उत्सव महिला मंडळ रंगारीपुरा, नवदुर्गा उत्सव मंडळ जैताई नगर येथे हा उपक्रम राबवला जात आहे. कार्ड काढण्यासाठी या मंडळाला भेट द्यावी लागणार आहे. तर उद्या (मंगळवारी) नवदुर्गा उत्सव मंडळ तेली फैल, महिला दुर्गा उत्सव मंडळ सिंधी कॉलोनी व नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ वणी येथे हा उपक्रम राबवला जाणार आहे. हे अभियान मोफत असून  कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असून सोबतच रेशन कार्ड व अर्जदाराचा मोबाईल नंबर (आधारला लिंक असलेला, OTP साठी आवश्यक) आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता वणी विधानसभेचे सर्व वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हा सोशल मिडीया अध्यक्ष दीपक पाउणकर, शहर उपाध्यक्ष डॉ. रोहित वनकर, शहर सचिव राजू देवराव गव्हाणे, युवा मोर्चा अध्यक्ष बालाजी मारोतराव भेदोडकर, शहर सहकोषाध्यक्ष ललित कचवे, हर्षल बिडकर व त्यांची संपूर्ण टिम परिश्रम घेत आहे.  

Comments are closed.