जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 12 डिसेंबरला भारतीय बौद्ध महासभा वणी तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेबआंबेडकर ह्यांचे पुत्र भैय्यासाहेब अर्थात यशवंत भीमराव आंबेडकर यांची जयंती भीमनगर येथील महाप्रज्ञा बुध्दविहार येथे झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रवीण वनकर होते. सज्जन रामटेके, यवतमाळजिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष हरेंद्र जंगले, भारतीय बौध्द महासभा वणी तालुका कोषाध्यक्ष आनंद पाटील, गौतम धोटे, वंचित बहुजन आघाडीचे किशोर मून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौध्द महासभेचे सरचिटणीस रमेश तेलंग ह्यांनी केले.त्रिसरण पंचशीलाने कार्यक्रमाची सुरवात झाली. वैशाली पाटील, विद्या भगत, सज्जन रामटेके ह्यांनी भैय्यासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. भारतीय बौद्ध महासभा शहर महिला कार्यकारिणीची यावेळी स्थापना करण्यात आली. लॉकडाऊन संपल्यानंतर उपासिका शिबिर आयोजीत करण्याचे ठरले.
कार्यक्रमाला केंद्रिय शिक्षिका नलिनी थोरात, तुळसा नगराळे, पुष्पा लोहकरे, मुनेश्वर, सुचिता पाटील, वैशाली पाटील, करुणा कांबळे, अर्चना कांबळे, प्रिया भगत, प्रतिभा रामटेके, ज्योती चंदनखेडे, गंगा
खोब्रागडे, वनमाला नगराळे, अर्चना दुर्गे, सुनिता दुपारे, अंजू पासवान, मुन्नी डोंगरे, ताई डोंगरे, सुनंदा अंबागडे, प्रीती करमनकर, बरखा मून, जया गेडेकर उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन दादाभाऊ घडले यांनी केले. सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा