महिलांनी आता रडायचं नाही, तर लढायचं: खाडे

0

रोहन आदेवार, वणी: महिला अत्याचारात वाढ होत आहे. याला पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे. पुर्वापार चालत आलेला हा पुरूषप्रधान संस्कृतीचा पगडा सहजासहजी कमी होणार नाही. त्यामुळे या प्रवृत्ती विरोधात महिलांनी लढाऊ बाण्याने विरोध करणेही गरजेचे आहे. ही प्रवृत्ती रडून नाही तर लढून दूर होणार असे प्रतिपादन वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी केले. वणी तालुक्यातील केसुर्ली गावात लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सुरू आहे. या विशेष शिबिरात बौध्दिक सत्रात महिलांवरील अत्याचार संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ठाणेदार बाळासाहेब खाडे म्हणाले की समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी विविध विभागाच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे मात्र त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शारिरीक शोषण, खुले आम होणारी फेसबुक, व्हाट्सएप, इन्स्टाग्राम अशा प्रकारच्या सोशल साईटच्या विविध माध्यमातून महिलांना फेक अकाउंट बनवून फसविले जात आहे.

महिलांवर अत्याचार झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून संशयिताला कठोर कायदेशीर शिक्षा होणे जितके महत्वाचे आहे, तितकेच हे अत्याचारच होऊ नये अथवा ते रोखणे महत्वाचे आहे,  असेही ते म्हणाले. समाजामध्ये कोणत्याही नागरिकाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास माझ्याशी सम्पर्क साधा मी तुम्हाला मदत करण्यास सदैव तयार आहे असे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगला टोंगे(सरपंच केसुर्ली) तर प्रा. अरुंधती निनावे (प्राचार्य लो.टि. महा वणी) तर प्रा. राठोड व प्रा. हूड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश माघाडे (कार्यक्रम अधिकारी रा.से.यो) तर सूत्रसंचालन  प्रियंका नवले व आभार प्रदर्शन कोमल लांजेवार व या कार्यक्रमासाठी प्रा.किशन घोगरे (कार्यक्रम अधिकारी रा.से.यो) व विद्यार्थांनी परिश्रम घेतले.

लिंकवर क्लिक करून पाहा भाषणाचा व्हिडीओ..

Leave A Reply

Your email address will not be published.