देव येवले, मुकुटबन : अडेगाव येथे संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता शेतकऱ्याचा राजा बळीराजा यांच्या प्रतिमेचे पुजन करून बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. यावेळी गावात मोठी मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर बस स्टॉप जवळ वामणाच्या प्रतिककृतीचे दहन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरवात बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. डॉ.मासिरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं, त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. यावेळेस या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. श्रीकांत पानघाटे यांनी बलीराजा समजाऊन सांगतांना म्हणाले की…
वामनाने पहिल्या पावलाने विशिष्ट भुप्रदेशातील लोकांना यज्ञाच्या कर्मकांडात गुंतवून टाकले व दुसरे पाऊल वेदप्रामाण्य होते. लोकांनी वेदांवर विश्वास ठेवावा आणि आपली बुद्धी स्वतंत्रपणे मुळीच वापरू नये असा या पावलाचा अर्थ होता. तिसरे पाऊल बहुजनांच्या वाकशक्तिला कुंठित करून टाकणारे होते. म्हणजेच वाणी वापरण्याचा खराखुरा अधिकार ठराविक लोकांनाच असेल आणि इतरांनी लिहिणे, वाचणे , बोलणे या बाबतीत स्वतंत्रता राहता कामा नये असा कठोर नियम करण्यात आला. तात्पर्य यज्ञाने भुमी व्यापणे,वेदप्रामाण्याने लोकांना गुलाम करणे आणि वाणीवर एकाधिकार प्रस्थापित करणे हा वामनाच्या तीन पावलांचा खरा अर्थ आहे. आपल्या बळीराजाला मारणारा आपला देव अवतार कसा ? आजही शेतकरी बळीप्रतिपदेला “इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे” असं म्हणतात.
ते असेही म्हणाले की प्रत्येक बहुजनांने बळीराजाचे गुणगान गायले पाहिजे. इतिहासातील एका अनमोल रत्न असलेल्या महात्मा बळीराजाला खरे अभिवादन हेच ठरेल.
या कार्यक्रमास प्रमूख पाहुणे म्हणून संदीप ठाकरे, डॉ. मासिरकार, अशोक पानघाटे (ग्रा.पं) छत्रपती काटकर (ग्रा.पं ), विजय भेदुरकार (संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अडेगाव) यांची उपस्थिती होती. तर प्रस्तावना प्रशांत बोबडे, झरी तालुकाध्यक्ष सं. ब्रिगेड यांनी केली.
कार्यक्रमासाठी राहुल हिवरकार , दिवाकर हिरादेवे, अमोल हिवरकर, काशिनाथ काटकर, केतन ठाकरे , मंगेश झाडे, प्रणय पाझरे , जयपाल नगराले, विशाल पारखी, गौरव धोटे, सागर पानघाटे, अमोल गौरकार, संतोष पारखी, प्रविण आसुट्कार, उमेश शेरकी , संदीप आसुटकार, नितेश ठाकरे, दीपक हीरादेवे, विवेक सोनटक्के, रामदास गोचे, राजू झाडे, संजय आसुटकार, पुरुषोत्तम आसुटकार, शुभम राऊत, सुरज गावंडे आदी गावातील युवकांनी परिश्रम घेतले.