वणी येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन

सुप्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची उपस्थिती

जितेंद्र कोठारी, वणी : शिव महोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील बाजोरिया लॉनमध्ये शनिवार15 ऑक्टो. व रविवार 16 ऑक्टो. रोजी सायंकाळी 6:30 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय व्याख्यानमालेत व्याख्याते म्हणूऔरंगाबाद येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर उपस्थित राहणार आहे.

व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी स्मृतिशेष रामचंद्र जागोजी सपाट यांचे स्मृतिप्रीत्यर्थ ‘दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ह्या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या दिवशी स्मृतिशेष सांबशिव नारायणराव देवडे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकशाहीचे वर्तमान’ विषयावर परिचर्चा व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

शिव महोत्सव समिती,वणी तर्फे आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष आहे. यापूर्वी या व्याख्यानमालेत गंगाधर बनबरे, कॉम्रेड स्मिता पानसरे, शेतकरी नेते विजय जावंधिया, कु. मंजुश्री पवार, उत्तम कांबळे, चंद्रकांत वानखेडे, साहेबराव खंदारे इत्यादी वक्त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. वणी व परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब व इष्टमित्रांसह व्याख्यानमालेत उपस्थित राहून या वैचारिक मेजवाणीचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन शिव महोत्सव समिती, वणीच्या वतीने करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.