आता टार्गेट स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा
वणीच्या सत्कार सभेत धानोरकर यांची भीष्मप्रतिज्ञा
निकेश जिलठे, वणी: केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर पश्चिम भारतातूनही काँग्रेस प्रणित महाआघाडीचे निवडून आलेले चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांचा आज रविवारी वणीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की संपूर्ण भारतात मोदी लहर असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस काँग्रेस प्रणित महाआघाडीचा उमेदवार म्हणून विजय खेचून आणताना, आता माझे पुढील टार्गेट चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था भाजप मुक्त करणे आहे, अशी प्रतिज्ञा त्यांनी यावेळी केली.
प्रचंड जनसमुदाय जमलेल्या आजच्या जाहीर नागरी सत्कार सभेत नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर पुढे म्हणाले की चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील केंद्र शासनांतर्गत येणाऱ्या समस्या व प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल. यासाठी आपण निवडणुकीत जी एकजूट दाखवली अशीच एकजूट यापुढेही दाखवण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली
पंधरा सातत्याने पंधरा वर्षे सातत्याने पंधरा वर्ष युतीचे खासदार म्हणून या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या हंसराज अहिर यांच्यावर तोफ टाकताना बाळू धानोरकर यांनी त्यांची कारकीर्द म्हणजे केवळ विकासाची कोरी पाटी राहिली असाही आरोप त्यांनी केला. घरी लोक कामासाठी येतात म्हणून केवळ भाजप कार्यकर्त्यांच्या छोट्या-छोट्या समारंभाला अतिथी म्हणून मिळवण्यातच हंसराज अहिर आणि धन्यता मानली व विकासाचे प्रश्न मन सोडवता प्रलंबित ठेवले असाही आरोप त्यांनी केला.
आपला विजय केवळ काँग्रेस पक्षाचा विजय नसून या महाआघाडीत येणाऱ्या राष्ट्रवादीसह इतरही घटक पक्षाचा असून, मनसेने दिलेल्या प्रामाणिक मदतीचाही आहे असा आवर्जून उल्लेख त्यांनी यावेळी केला. सोबतच मुस्लिम, दलित, आदिवासी, धनगर इत्यादी समाजाने मोठ्या विश्वास दाखवला याचाही तो विजय असल्याचे म्हणत त्यांनी आभार मानले.
लोकसभेचे तिकीट आणि प्रतिभाताई
आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणे व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपण का लढवली? याचे रहस्य आज नागरी सत्काराला उत्तर देताना खासदार धानोरकर यांनी उपस्थित जनसमुदायासमोर उलगडले. हंसराज अहिर यांच्या विकास कामाबद्दल असलेली अनास्था आणि त्यांच्या एकूणच कार्यप्रणालीवर मतदार नाराज असल्याने आपल्याला चांगली संधी असल्याची बाब आपली सुविद्य पत्नी सौ प्रतिभाताई यांनी आपल्या निदर्शनास आणून दिली, असे धानोरकर यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीला आपण लोकसभा निवडणुकीसाठी मानसिकदृष्ट्या तयार नसताना आपली पत्नी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. इतकंच नव्हे तर तिने विधानसभा क्षेत्र पिंजून काढले काढले याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. तरीही आपण तयार नसताना घरचे सगळे सोने विका पण ही निवडणूक लढवा. असा मानसिक आधारही आपल्या सौभाग्यवतीने यावेळी दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याची जाणीव पुन्हा एकदा उपस्थित जनसमुदायास त्यांनी करून दिली.
टिळक चौकात झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वणीकर उपस्थित होते. तत्पूर्वी संध्याकाळी वणीतील टिळक चौक, शाम टॉकिज, वामनराव कासावार यांच्या घराजवळून मिरवणूक काढण्यात आली. डीजे न बँडच्या तालात वाजत गाजत विजयी उमेदवार बाळू धानोरकर यांची मिरवणूक काढण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणावरून निघालेली ही मिरवणूक एकत्र आली. ही मिरवणूक गांधी चौक, दीपक चौपाटी, आंबेडकर चौक असा मार्गक्रमण करत याचा शेवट टिळक चौकातील सभास्थळी झाला.
सत्कार सभेला रात्री 9 नंतर सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव कासावार होते तर विशेष अतिथी म्हणून माणिकराव ठाकरे व वझाहत मिर्जा होते. यासोबतच संजय देरकर व राष्ट्रवादीच्या प्रतिनिधिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास काळे यांनी केले. यावेऴी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत बाळू धानोरकर यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार प्रमोद वासेकर यांनी मानले.