वणीत प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची विक्री होऊ देऊ नका

मूर्तीकार संघटनेचे नगरपालिकेला निवेदन

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आगामी काळात श्री गणेश उत्सव सण मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमीत्त वणी शहरातील सर्व व्यावसायिक मूर्तीकारांनी पर्यावरण पुरक मातीच्या मूर्त्या बणविण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. परंतु काही व्यवसायिक लोकांनी बाहेरून प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्ती वणी शहरात विक्रीसाठी आणल्या आहेत. प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणण्याची मागणी मूर्तीकारांनी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने शहरातील मूर्तीकारांनी याबाबत आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी नगर पालिकेला स्मरणपत्र दिले असून या तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

वणी शहरात प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीला शासनाकडून बंदी आहे. यामूर्तींपासून पर्यावरणाला धोका आहेत. शिवाय यामुळे नदीचे देखील मोठे नुकसान होते. शहरातील मूर्तीकारांनी प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न बनवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही व्यावसायिकांनी बाहेगावाहून वणी शहरात विक्री करीता बंदी असलेल्या मूर्त्या आणल्या आहेत.

याबाबत आज शहरातील व्यावसायिक मूर्तीकारांनी नगरपालिकेला स्मरण पत्र देऊन प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची शहरात विक्री होऊ देऊ नये तसेच बंदी असलेल्या मूर्तीची जे विक्री करणार अशांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी मूर्तीकार सुधाकर बुरडकर, ,नथ्थु डुकरे, सुहास झिलपे, विनोद घोटकर, गंगाधर खंडारे, रवींद्र पाटाळकर, कमलाकर झिलपे, महादेव कपाट यांच्यासह मूर्तीकार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

हे देखील वाचा:

एनबीएसए कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.