एनबीएसए कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

अपूर्ण राहिलेले शिक्षण देखील करता येणार पूर्ण

0

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नुरजहाँ बेगम सलाम अहमद (एनबीएसए) कला व वाणिज्य महाविद्यालयात 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी आर्ट्स आणि कॉमर्स या तीन वर्षांच्या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात बी.ए. व बी.कॉम. साठी प्रवेश दिला जात आहे. या कोर्ससाठी 12 वी पास असलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. याशिवाय एन.बी.एस.ए. महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र देखील आहे. त्यामुळे व्यावसायिक, नोकरदार किंवा काही कारणास्तव शिक्षण अपूर्ण राहिलेल्यांनाही याच महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे कॉलेजला एकदा अवश्य भेट द्यावी किंवा 9764402021 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कॉलेज व्यवस्थापनाद्वारे करण्यात आले आहे. 

कॉलेजमध्ये प्रत्येक शनिवारी साप्ताहिक टेस्ट घेतली जाते. क्रीडा कला क्षेत्रात रस असणा-या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. तसेच कॉलेजचा वार्षिक अंक प्रकाशित केला जातो. यात विद्यार्थ्यांच्या साहित्य प्रतिभेला वाव देण्यात येतो. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही सुविधा, रिडिंग रूम, विद्यार्थ्यांसाठी इंटरनेटसाठी वेगळी व्यवस्था आहे. स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी इग्नुच्या विविध अभ्यासक्रमाची प्रोजेक्टरद्वारा शिकवणी घेतली जाते. तसेच विद्यार्थ्यांना विद्यापिठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतसुद्धा सहभागी होता येते.

किमान कौशल्यावर अधिक भर – डॉ. रोहित वनकर 
केवळ कॉलेजचा अभ्यासक्रमच नाही तर इतर शैक्षणिक उपक्रमावरही भर देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमांनाही खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे कॉलेजतर्फे ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेत असतानाच त्यांच्यासाठी विद्यापिठाचे विविध किमान कौशल्यावर आधारीत वर्कशॉपचे आयोेजन केले जाते. लेदर बॅग मेकिंग प्रशिक्षण, पेपर बॅग मेकिंग असे विविध एन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट वर्कशॉप असे विविध वर्कशॉप कॉलेजतर्फे घेण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण घेताना किंवा शिक्षण संपल्यावर विद्यार्थ्यांना गृह उद्योग, लघू उद्योग सुरू करण्यास चांगली मदत होते. सोबतच आजच्या कॉर्पोरेट जगतात आपला विद्यार्थी मागे राहू नये यासाठी ब्रिटिश कॉन्सिलचा ‘इंग्लिश स्ट्रोक्स’ हा कोर्सही आम्ही कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिला आहे.
– डॉ. रोहित वनकर, प्राचार्य एनबीएसए कॉलेज वणी

महाविद्यालयात 3 वर्षांच्या डिग्री कोर्ससह तीन महिन्यांचे क्रॅश कोर्सही करता येणार आहे. यात टॅली, कॅशिअर व डीटीपी हे शॉर्ट टर्म कोर्सही उपलब्ध आहेत. हे कोर्स संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या आजिवन व विस्तार सेवा विभाग मान्यता प्राप्त असून यात 12 वी पास असणा-या कुणालाही प्रवेश घेता येणार आहे.

पूर्ण करा अपूर्ण राहिलेले शिक्षण
आपल्या आयुष्यात डिग्री मिळवण्याची संधी हुकली असेल किंवा काही कारणांमुळे शिक्षण घेणे थांबेल असेल तर ते पूर्ण करण्याची संधी आता चालून आली आहे. एन.बी.एस.ए. महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र देखील आहे. इथे पूर्वतयारी, बी. ए. आणि बी. कॉमसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. काही कारणास्तव शिक्षण थांबले असेल. किंवा फेल झाले असल्यास डीग्री घेण्याची व शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठाद्वारा मिळणार आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क: एनबीएसए महाविद्यालय अहमद ले आऊट, वडगाव रोड, न.प. शाळा क्रमांक 7 जवळ, विठ्ठलवाडी वणी येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 9764402021 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

या लिंकवर क्लिक करूनही अधिक माहिती घेता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.