बँक ऑफ महाराष्ट्र कडून शेकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ
शेतकऱ्यांचा बँकेसमोर आमरण उपोषणाचा इशारा
सुशील ओझा, झरी: सरकारने शेतकऱ्याना शेती करण्याकरिता बहुतांश बँकेत कर्जा करिता सुविधा करून दिली असून “अर्ज द्या कर्ज घ्या “ही योजनाही राबविण्यात येत आहे. परंतु तालुक्यातील पांढरवाणी, भीमनाळा व महादापूर या गावातील शेतकर्यांना कर्ज देण्यास बँके कडून टाळाटाळ केली जात असल्याने बँकेविरोधात प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे.
वरील गावातील शेतकरी महाराष्ट्र बँके व्यतिरिक्त तालुक्यातील कोणत्याही बँकेशी जुडलेले नाही. त्यामुळे दरवर्षी याच बँकेतून कर्ज काढून ते शेती करीत आहेत. तर सर्व व्यवहार सुद्धा याच बँकेत करतात. शेतकरी कोणत्याही बँकेशी जुडून नाही असे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र घेऊन शेतकरी कर्ज मागणीसाठी आले असता बँकेतील अधिकाऱ्याने कर्ज देण्यास नकार दिला. ज्यामुळे संतप्त शेतकरी यांनी बँक व्यवस्थापक सह तहसीलदार व पोलिस स्टेशनकडे लेखी तक्रार केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की त्वरित कर्ज न दिल्यास बँकेसमोर आमरण उपोषणास बसणार असा इशारा देऊन उपोषण दरम्यान काही बरेवाईट झाल्यास बँक कर्मचारी व व्यवस्थापक जवाबदार असल्याचेही स्पष्ट केले.
तक्रार करते वेळी पैकीबाई मेश्राम, मादेव आत्राम,पैकू रामपुरे, लेतू दडांजे,अय्या सिनू आत्राम, नामदेव आत्राम, बापूराव आत्राम, गुलाब टेकाम,अय्या लेतू आत्राम, अय्या भीमा आत्राम, राणीबाई टेकाम, तुर्कीबाई आत्राम, फुलू कुमरे, भीमराव कुमरे, मारोती टेकाम, श्यामराव मेश्राम, पांडुरंग आत्राम, अय्या कुमरे, पुनाजी सताम, भेसा आत्राम उपस्थित होते.
देशाच्या जडणघडणीत आदिवासी बांधवांचा सिंहाचा वाटा आहे. आदिवासी बांधव सर्वांना संस्कार आणि संस्कृती दाखवणारे दिशादर्शक आहेत. स्वातंत्र्य चळवळीसह स्वराज्यासाठी त्यांनी केलेले बलिदान हे देशासमोर न फेडता येणारे ऋण आहेत. त्यांचा गौरव करताना उर भरून येतो असे प्रतिपादन यावेळी