बारा बलुतेदार महासंघाच्या कार्याध्यक्षपदी प्रवीण खानझोडे
कर्तृत्त्ववान युवकाच्या निवडीने सर्वत्र उत्साहाचे वातावरण
जब्बार चीनी, वणी: स्थानिक विश्रामगृहात बारा बलुतेदारांचं संघटन बळकटीसाठी बैठक झाली. यावेळी बारा बलुतेदार महासंघाच्या कार्याध्यक्षपदी प्रवीण खानझोडे यांची निवड झाली. अशा कर्तृत्त्ववान युवकाच्या निवडीने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
बैठकीत समाजाच्या उत्थानासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व शासन प्रशासन आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास, हाच एकमात्र उद्देश ठेवून बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. ह्या महत्वपूर्ण बैठकीत बारा बलुतेदार संघटनात्मक वणी झरी मारेगाव तालुक्यात समाजाची गावनिहाय संघटन मजबुत करण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
हजारो वर्षांपासून बारा बलुतेदार समाज सर्व मानव जातीच्या कौटुंबिक व जीवनावश्यक वस्तूचा स्वनिर्मित पुरवठा करीत आहे. परंतु शासन, प्रशासनामध्ये बारा बलुतेदार समूहाला पाहिजे तसा वाटा कुठं मिळताना दिसत नाही. केंद्र तथा महाराष्ट्र स्तरावर आपल्या समूहाचे मोठ्या प्रमाणात नेते पुढारी निर्माण झाले व मोठ्या पदावर आहेत. केंद्रात व राज्यात निवेदन देण्यापलीकडे कुठलीही भूमिका मांडताना दिसत नाही.
याला कारण म्हणजे आपल्यातील असंघटितपणा, बारा बलुतेदार समाज जर एकत्रित आला तर आपण आपल्या मागण्या शासनाच्या दरबारी प्रशासनाच्या माध्यमातून मांडू शकतो. त्या अनुषंगाने रविवारी वणीतील विश्रामगृह येथे बारा बलुतेदार निष्ठावान व कार्यकुशल समाजबांधवांची बैठक झाली.
ह्या बैठकीला राजूभाऊ तुराणकर,शशिकांत नक्षीने, विनोद धाबेकर,संजय गाथाडे आकाश खंडाळकर,अजिंक्य शेंडे,संदीप गोहोकार,श्रीकांत किटकुले,रामकृष्ण दुधलकर बंडू येसेकर,सचिन पिंपळकर, विजय कडूकर,विजय दोडके, पुरुषोत्तम नवघरे,ललित लांजेवार,रवी घुमे, शिरीष क्षीरसागर, राहुल चट्टे , प्रदीप मुक्के, सुनील अक्केवार, किसन मोहबिया, हरिष मोहबिया,ध्रुव येरने, बारा बलुतेदार समाजबांधव उपस्थित होते.बैठकीनंतर प्रवीण खानझोडे यांचा सत्कार करण्यात आला.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा