रमेश तांबे, वणी: शहरा लगत असलेल्या चिखलगाव येथील बोधे नगर परिसराततून एका टॅक्टरमधील बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. 25 च्या मध्यरात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी आता एका आरोपीला वणी पोलिसांनी अटक केली आहे.
किशोर डवरे हे बोधे नगर येथील रहिवाशी आहे. त्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर त्यांनी 25 डिसेंबर रोजी घरासमोर उभे ठेवले होते. मात्र दुस-या दिवशी 26 डिसेंबर रोजी त्यांना त्यांच्या ट्रॅक्टरमधली बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचे लक्षात आले. त्यांचा गावातीलच एका आरोपीवर संशय होते. त्यानुसार त्यांनी वणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास केला. त्यांना गावातीलच अमोल विजय ठाकरे (27) याने बॅटरी चोरुन नांदेपेरा रोड वरील गजानन नगरी येथील प्लॉटमधल्या झाडाझुडपात लपवून ठेवली असल्याचे समोर आले. सदर बॅटरीची किंमत 7 हजार रुपये आहे. सदर बॅटरी पोलिसांनी जप्त करून आरोपी विरूद्ध भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुदर्शन वानोळे करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.