झरीत बंदमध्ये चोरट्याने फोडले बार, 33 हजारांच्या दारूची चोरी
चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेरे फोडून रेकॉर्डिंग केली डिलिट
सुशील ओझा, झरी: सध्या कोरोनामुळे बियरबार आणि वाईन शॉप बंदचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बार आणि शॉप बंद आहे. यायाच फायदा घेऊन चोरट्याने रात्री झरी येथील एक बिअर बार फोडले. सकाळी ही घटना उघडकीस आली. यात एकून 33 हजारांच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या दारू चोरट्यांने लंपास केल्या आहेत.
वणी येथील रहिवाशी असलेले राहुल डफ यांचे झरी येथे राहुल नावाचे बियरबार आहे. काल 29 मार्च रोजी परिसरात वादळी वारा होता. त्यामुळे तिथे चौकीदार नव्हता. याचाच फायदा येऊन अज्ञात चोरट्याने बारला लावलेले शेटरचे लॉक तोडले. आत प्रवेश केला व बारमधल्या जवळपास सर्वच माल त्यांनी उचलून नेला. यात विविध कंपनीच्या एकून 33 हजारांचा माल होता.
सकाळी बार फोडल्याचे उघडकीस येताच स्थानिक रहिवाशी ज्ञानेश्वर अरके यांनी बार मालक राहुल डफ यांना याबाबत माहिती दिली. राहुल डफ यांनी चोरीची माहिती पाटण पोलीस स्टेशनला दिली. यावरून पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे सह जमादार अभिमान आडे रमेश मेश्राम नरेश गोडे अंकुश पातोडे घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.
चोरटा फारच ‘शातिर्द’ असल्याची चर्चा
चोरी करण्याआधी चोरट्याने बारच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. हा चोरटा त्यावरच थांबला नाही तर त्याने कॉम्पुटर मधील कॅमे-याची संपूर्ण रेकॉर्डिंग डिलीट केली. झरी सारख्या परिसरात इतक्या सफाईने याआधी कधीही चोरी झालेली नाही. त्यामुळे हा चोरटा खूपच शातिर्द असल्याची परिसरात चर्चा रंगत आहे.
झरीमध्ये 4 बियरबार व 1 देशी दारूचे दुकान आहे. देश लॉक डाऊन केल्यामुळे सर्व लहान मोठे दुकाने बियरबार देशी दारूचे दुकाने बंद करण्यात आले आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून दारूचे संपूर्ण दुकाने बंद आहे. त्यामुळे सध्या अवैध दारू विक्रीला उत आला आहे. अवैधरित्या दारू दीड ते दुपटीने विकली जात आहे. अवैध दारू विक्रेत्यानेच हे दुकान फोडले असावे असाही संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 457, 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे करीत आहे.