अबब…! आंदोलनात सहभागी झाल्याने एकाला जबर मारहाण

कळमना येथील घटना, परस्पर विरोधात तक्रार दाखल

विवेक तोटेवार, वणी: आंदोलनात सहभागी झाल्याने एकाला काठीने व बुक्कीने मारहाण करण्यात आली. बुधवारी दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील कळमना येथे ही घटना घडली. या प्रकरणी फिर्यादी शंकर येटे यांच्या तक्रारीनुसार वणी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी परस्पर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

तक्रारीनुसार, फिर्यादी शंकर गंगाधर येटे (41) हे कळमना ता. वणी येथील रहिवासी आहे. ते मजुरी करतात. कळमना गावात रस्ता नसल्याने सध्या गावातील लोक लालपुलीया परिसरात आंदोलन करीत आहे. बुधवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी शंकर हे दु. 4 वाजताच्या सुमारास त्यांचा साळा अजय मडावी यांच्यासह लालपुलीया परिसरात आंदोलनात सहभागी होण्यास गेले होते. काही वेळ आंदोलनात थांबल्यानंतर ते साळ्याच्या दुचाकीने गावी परत जाण्यास निघाले.

कळमना गावातील ग्रामपंचायतजवळ शंकर व त्यांचा साळा दुचाकीने पोहोचले होते. दरम्यान या ठिकाणी महेश मधुकर क्षीरसागर (36) रा. कळमना याने शंकर यांना आवाज देऊन थांबवले. ते थांबल्यानंतर आरोपी महेश तिथे पोहेचला व त्याने तुम्ही आंदोलनात जाऊन गडबड का केली? असे म्हणत शंकर सोबत वाद घातला. पुढे वाद वाढून महेशने शंकरला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान या ठिकाणी गावातील महादेव मडावी हे वाद सोडवण्यासाठी गेले व त्यांनी आरोपीजवळील काठी हिसकली. त्यानंतर आरोपीने शंकर यांच्या तोंडावर बुक्की मारली. त्यामुळे त्यांच्या तोंडातून रक्त निघाले. तसेच पुन्हा आंदोलनात सहभागी झाले तर जीवे मारील अशी धमकी दिली.

मारहाण व धमकी दिल्याने शंकर यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी महेश क्षीरसागर विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम 324, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला.

विरोधात तक्रार दाखल
तक्रारीनुसार, दिनांक 13 डिसेंबर रोजी दु. 4.30 वाजता फिर्यादी हुमराज क्षीरसागर हा शेतात जात होता. दरम्यान जि. प. शाळेजवळ तिथे शंकर हा हुमराजच्या जवळ गेला. त्याने हुमराजला अश्लिल शिविगाळ करीत अंगावर धावून आला. तसेच फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपी हा नेहमी फिर्यादी व त्याच्या लहान भावासोबत वाद घालत असतो. अखेर फिर्यादीच्या तक्रारीनुसार वणी पोलीस ठाण्यात आरोपी शंकर गंगाधर येटे याच्याविरोधात भादंविच्या कलम 294, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

शुल्लक कारणावरून महिलेला लाकडी दांड्याने मारहाण

सावधान…! चिखलगाव रोडवरील मॉलसमोरून दुचाकी चोरी

मध्यरात्री बसस्थानक परिसरात आढळला संशयास्पद हालचाली करताना युवक

Comments are closed.