जुन्या वादातून खासगी वाहन चालकास मारहाण

रविवारी रात्री पेट्रोल पम्पजवळ घडली घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: जुन्या भांडणाच्या रागातून एका इसमास शिविगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की सचिन रामभाऊ सराफ (वय 36 वर्ष) रा. वणी हा खासगी वाहन चालक आहे. त्यांचा काही दिवसांआधी आरोपी सुनील आगलावे (वय 37 वर्ष) रा. गणेशपूर यांच्याशी वाद झाला होता. सुनीलने हा राग मनात धरून ठेवला होता.

रविवार 20 डिसें. रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान सचिन रामभाऊ सराफ लाठीवाला पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिरच्या ओट्यावर झोपून होता. दरम्यान सुनील आगलावे तिथे आला. त्यांने सचिनला झोपेतून उठवून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हातात दगड घेऊन डोक्यावर प्रहार केला. असा आरोपी सचिन यांनी तक्रारीतून केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सुनील आगलावे विरुद्द भादंविच्या कलम 324, 504, 506 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय बोरनारे करीत आहे.

हे देखील वाचा:

सुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड

हे देखील वाचा:

जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...