मार्डी चौकात राडा… चौघांनी केली एकास मारहाण

जुन्या वादाचा काढला वचपा... आरोपींवर गुन्हा दाखल

0

नागेश रायपुरे, मारेगाव: जुन्या वादातून चार जणांनी संगनमत करून एकास बेदम मारहाण केल्याची घटना 15 सप्टेंबर रोजी 4 वाजताच्या मारेगाव येथे घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसात 4 व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. विलास लीलाधर गोलर (39), अक्षय रवींद्र गोलर (25) रा.पांढरकवडा (पिसगाव), विनोद लीलाधर गोलर (40) रा. वरोरा, नंदू मारोती गायकवाड (47) रा. कुसना असे मारहाण प्रकरणातील आरोपींचे नाव आहे.

फिर्यादी विकास बाळकृष्ण जरिले (38) रा. पांढरकवडा (पिसगाव) यांचा आरोपींनी जुना वाद होता. मंगळवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी विकास जरिले हे युरिया खत घेण्यासाठी साठी मारेगाव येथे आले होते. खताची बॅग न मिळाल्याने ते गावाकडे परत जात होते. दरम्यान चार वाजताच्या सुमारास आरोपींनी मार्डी रोडवर असलेल्या देशी दारूच्या दुकाना समोर विकास जरिलेंची वाट अडवली व त्यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वाद सुरू असताना आरोपी विलास व विनोद या दोघांनी विकासला वेळवाच्या काठीने मारहाण केली तर अक्षय यांनी बियर च्या बॉटल ने मानेवर वार करून जखमी केले. नंदू यांने लाथा बुक्याने खाली पाडून हात पाय, पाठीवर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी फिर्यादी विकास जरिले यांच्या तक्रारीनुसार चारही आरोपींवर भादंविच्या कलम 326, 294, 506, 34 अनव्ये मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात होत आहे.

(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.