बाजार समितीच्या सचिवास कार्यालयात मारहाण

राम आईटवार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल

0

सुशील ओझा, झरी: मुकूटबन बाजार समितीमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली. याकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. नोंदणीनुसार ज्या शेतकऱ्यांचा नंबर लागला त्यांना बाजार समितीतर्फे फोन करुन कापसाची गाडी आणण्यास सांगितले जात आहे. व त्याच प्रमाणे प्रत्येक दिवसाला ३० शेतकऱ्यांनाचा कापूस घेतल्या जात आहे.

पाटण येथील सामाजिक कार्यकर्ते राम आईटवार ७ मे रोज दुपारी १ ते २ वाजता दरम्यान बाजार समितीच्या मुख्य गेटला लाथ मारत कार्यालयात आले. सचिव येल्टीवार यांच्या कॅबिन मध्ये कामकाज करीत होते. त्यांच्या सोबत संचालक अरविंद एनगंटीवार, डॉ हिम्मतराव चवरडोल असतांना आईटवार आले व सीसीआयचे कापूस खरेदी नोंदी रजिस्टरची मागणी केली. यावर अर्ज करा संपूर्ण माहिती देतो असे सांगितले.

आईटवार हे ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. ते अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अंगावर धावून आले. महिला संगणक कर्मचारी ही धावत येऊन सोडवण्याचा प्रयत्न केला असता तिला ढकलून मारहाण केली व कार्यालयातील रेकॉर्ड व ऑफिस जाळून टाकतो अशी धमकी दिली असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

आईटवार यांनी यापुर्वी सुद्धा दोनवेळा अश्याच धमक्या दिल्या असल्याची तक्रार मुकूटबन पोलीस स्टेशन ला दिली यावरून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा जिवाने मारण्याची धमकी व अश्लील शिवीगाळ प्रकरणी कलम 353, 323, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे

आईटवार यांच्यापासून जिवाला धोका – येल्टीवार

आईटवार यांच्यापासून माझ्यासह कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून ७ मे पासून सुरक्षा व न्याय न मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व कर्मचारी कामकाज बंद करीत अडून शेतकऱ्यांची गैरसोय झाल्यास आम्ही जवाबदार नसल्याचे जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या पत्रातून केले आहे. – येल्टीवार, सचीव एपीएमसी मुकुटबन

शेतक-यांसोबत भेदभाव होत आहे  – आईटवार

मी शेतकरी असून माझ्या गाडीचा नंबर न लागल्याने मी विचारपूस केली. बाजार समितीच्या सर्व संचालकांनी स्वतःचे व आपल्या नातेवाईक , मित्राचे नाव पहिले टाकून घेतले व त्यांचाच कापूस खरेदी केल्या जात आहे. शेतकऱ्यांत भेदभाव करीत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांत मोठा रोष निर्माण झाला आहे. बाजार समिती चुकीचे काम करून शेतकऱ्यांनाची फसवणूक करीत आहे.: राम आईटवार, सामाजिक कार्यकर्ते पाटण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.