उपाशी पोटी आणि अनवाणी पायाने मजूर झारखंडला रवाना

आरसीसीपीएल कंपनीच्या मजुरांचे हाल सुरूच...

0

विवेक तोटेवार, वणी: गेल्या सहा महिन्यांपासून मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीत काम करीत असलेल्या मजुर आपल्या गावाकडे जाण्यास निघाले. आयसीसीपीएल कंपनीने कामावरून काढले असल्याचे या मजुरांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते आपल्या मूळ राज्यात झारखंडला आपल्यासोबत काही आवश्यक सामान घेऊन जाण्यास पायीच निघाले आहे. याबाबत त्यांना कोणतीही सोयीसुविधा प्रशासनाकडून किंवा कंपणीकडून पुरविण्यात आलेली आहे.

बुधवारी 6 मे रोजी मुकुटबन येथील आयसीसीपीएल या कंपनीत काम करीत असलेल्या 400 मजुरांनी आपल्या गावात पायीच जाण्यास सुरवात केली. लॉकडाऊन असल्यामुळे यांना कोणतेही वाहन मिळू शकले नाही. शिवाय प्रशासनानेनी यांची कोणती मदत केली नाही. पाठीवर थोडे जीवनावश्यक वस्तू सोबत त्यांनी हा प्रवास सुरु केला. सायंकाळी ते वणीत पोहचले त्यांना याबाबत विचारणा केली असता कंपनीत कुठलेही काम नसल्याने कंपनीने हाकलल्याचे सांगितले. त्यामुळे ते आपल्या गावाला पायीच निघाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या सर्व मजुरांचे मेडिकल करण्यात आले त्यानंतर त्यांना जाण्यास परवानगी देण्यात आली. तसेच कंपनी ज्यांना राहावयाचे आहे ते राहू शकतात व ज्यांना जावयाचे आहे ते जाऊ शकतात. परंतु कामगारांनी पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला. व पायीच निघाले असे असले तरी हजारो किलोमीटरचा प्रवास ते कसे करणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काही मजुरांना माजरी जवळ ताब्यात घेऊन त्यांना वणीत आणल्याची माहिती मिळत आहे. तर काही मजूर नागपूरजवळील सावनेर येते सध्या पोहोचले असल्याची माहिती आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.