सुशील ओझा, झरी: तालुक्यात कापूस, सोयाबीन उत्पादन घेतल्यानंतर शेतकरी हरभरा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी तालुक्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा उपक्रम गावागावांत सुरू आहे.
मर रोग नियंत्रणासाठी आणि अधिकचे उत्पादन घेण्यासाठी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे अहवाहन कृषी विभाकडून करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या वतीने पिंपड येथे पोक्रा अंतर्गत शेतीशाळा घेण्यात आली.
शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे तंत्रज्ञान बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये हरभरा पिकाची पेरणी रुंद सरी वरबा (B.B.F) पद्धतीने करावे, तसेच बियाणे पेरणीपूर्वी बियाणाला कोणती द्रावणे लावून कशी पेरणी करावी. अशा प्रकारची माहिती कृषी सहाय्यक नीलेश घोडके यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी दिली.
तालुक्यात कापसावर येणाऱ्या गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तसेच कापूस बोंडसड यांच्या नियंत्रणासाठी उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी बदखल, मंडळ अधिकारी संजय अरक व कृषी सहाय्यक गावोगावी प्रचारप्रसिद्धी करीत आहे.
शेतकऱ्यांना कोणतीही शेती विषयक कोणतीही अडचण असल्यास संबंधित गावातील कृषी सहाय्यकाला संपर्क करावा. असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)